Thursday, February 22, 2024

Ashok Saraf | अशोक सराफांनी चुकून बोललेला ‘तो’ डायलॉग झाला अजरामर, ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाचा कधीही न ऐकलेला किस्सा

Ashok Saraf  | ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ हा डायलॉग ऐकला की, अत्यंत मजेशीर आणि मनोरंजनाच्या महासागरात नेऊन ठेवणारा एक धमाकेदार चित्रपट समोर येतो. ज्या चित्रपटातील प्रत्येक सीन पाहताना आयुष्यातील खरा आनंद सापडतो, आपल्या आवडीच्या कलाकारांना स्त्री वेशात पाहून आपल्या हास्याच्या सगळ्या सीमा पार होतात, विनोदी चित्रपटात ज्या चित्रपटाने कितीतरी पुरस्कार त्याच्या नावे केले, ज्याने आख्खा महाराष्ट्राला हसायला भाग पाडले, तो चित्रपट म्हणजे आपल्या सगळ्यांना आवडता ब्लॉकबस्टर ‘अशी ही बनवा बनवी’ होय. शुक्रवार (२३ सप्टेंबर) ‘अशी ही बनवा बनवी’ या चित्रपटाला २३ वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील प्रत्येक डायलॉग प्रचंड गाजला होता. ज्यामधील एक डायलॉग चुकून बोलला होता असा खुलासा अशोक सराफ यांनी केला आहे.

अशी ही बनवाबनवी चित्रपटात असे अनेक डायलॉग आहेत जे आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. चित्रपटात लक्ष्मीकांत आणि सचिन पिळगावकर स्त्री वेशभूषा करुन खोली बघायला जातात. ज्यामध्ये अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारली होती. यावेळी आपल्या पत्नीची ओळख करुन देताना अशोक सराफ यांनी हा माझा बायको पार्वती असे म्हणतात. चित्रपटातील या डायलॉगने प्रेक्षकांना प्रचंड हसवले. मात्र एका मुलाखतीत बोलताना अशोक सराफ यांनी हा चुकून आलेला डायलॉग असल्याचा खुलासा केला. पडद्यामागे ज्या प्रमाणे ते लक्ष्मीकांत यांच्याशी बोलायचे त्याच ओघात ते बोलून गेले. पण याच एका चुकीच्या डायलॉगनेच गेली 34 वर्ष  प्रेक्षकांना वेड लावले आहे.

व्ही शांताराम प्रोडक्शन प्रस्तुत सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट २३ सप्टेंबर, १९८८ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने तब्बल ३ कोटींची कमाई केली होती. त्यावेळी या चित्रपटाचे फर्स्ट क्लास तिकीट ३ रुपये, तर बाल्कनी तिकीट ५ रुपये एवढे होते. आताच्या काळात विचार केला, तर जवळपास १०० कोटीपेक्षाही जास्त या चित्रपटाचा गल्ला आपण गृहीत धरू शकतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- ‘बटण लावायला विसरलीस का…’, अभिनेत्री जान्हवी कपूरची विमानतळावर झाली चांगलीच फजिती, व्हिडिओ व्हायरल
हॉटेलमध्ये जेवायला गेला अन् प्रेमात पडला, अभिनेता बॉबी देओलची फिल्मी लवस्टोरी ऐकून व्हाल थक्क
ती एक चूक अन् बॉलिवूडला मिळाला जबरदस्त खलनायक, प्रेम चोप्रा यांचा रंजक किस्सा

 

हे देखील वाचा