Friday, October 17, 2025
Home अन्य पावर स्टार पुनीथ राजकुमारने केले ४६ वर्षात पदार्पण, चाहत्यांसह कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

पावर स्टार पुनीथ राजकुमारने केले ४६ वर्षात पदार्पण, चाहत्यांसह कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

कन्नड सिनेमाचे ‘पावर स्टार’ पुनीथ राजकुमार हे सिनेमा जगातील नामांकित कलाकारांपैकी एक आहेत, ज्यांचा चाहतावर्ग भलामोठा आहे. चाहते त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांनी बुधवारी (17 मार्च) आपला 46वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पुनीथ राजकुमार हे दाक्षिणात्य सिनेमाचे दिग्गज अभिनेते आणि सुपरस्टार राजकुमार यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी त्यांच्या वडिलांचे नाव कायम ठेवले आणि इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून बरेच यश मिळवले. सोशल मीडियावर ज्याप्रकारे पुनीथ यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे, त्यावरून त्याचे स्टारडम वडिलांइतकेच मोठे असल्याचे दिसून येते.

पुनीथ राजकुमार यांचे चाहतेच नव्हे, तर कन्नड इंडस्ट्रीचे मोठे सेलेब्सही त्यांना शुभेच्छा देत आहेत. कन्नड सिनेमाचे ज्येष्ठ अभिनेते किच्चा सुदीप, दर्शन, रिषभ शेट्टी इत्यादी अनेक नामवंतांनी पुनीथ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रक्षित शेट्टीने लिहिले, “आमच्या लाडक्या अप्पू सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

बाल कलाकार म्हणून त्यांनी 12 चित्रपटांत अभिनय केला आहे. 1986 मध्ये ‘बेट्टद हूवु’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. 80 च्या दशकात बाल कलाकार म्हणून चित्रपटात दिसल्यानंतर, त्यांनी ‘अप्पू’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ते एक सुपरस्टार अभिनेता आहेत. ‘आकाश’, ‘अरसू’, ‘मिलन’ आणि ‘वंशी’ यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयांमुळे पुनीथ ओळखले जातात.

याशिवाय, पुनीथ कन्नड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. दरम्यान, अभिनेत्याने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या ‘जेमस’ या चित्रपटाचे एक पोस्टरही शेअर केले आहे. ज्याला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडमध्ये गंभीर पात्र साकारत अभिनेता सुशांतने प्रेक्षकांच्या मनावर पाडली अभिनयाची छाप

-अमेझॉन प्राईम व्हिडिओकडून मराठी चित्रपट ‘पिकासो’च्‍या वर्ल्‍ड प्रिमिअरची घोषणा

-साठच्या दशकातील ‘चॉकलेट हिरो’, ज्याचे संपूर्ण कुटुंब होते चित्रपट उद्योगात

हे देखील वाचा