अमेझॉन प्राईम व्हिडिओकडून मराठी चित्रपट ‘पिकासो’च्‍या वर्ल्‍ड प्रिमिअरची घोषणा

प्‍लॅटून वन फिल्‍म्‍स एँड एव्‍हरेस्‍ट एन्टरटेन्मेंटच्‍या बॅनरअंतर्गत शिलादित्‍य बोराद्वारे निर्मित 'पिकासो'चे दिग्‍दर्शन व लेखन अभिजीत मोहन वारंग यांनी केले असून या चित्रपट राष्‍ट्रीय पुरस्‍कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक, तसेच समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम प्रमुख भूमिकेत आहेत.


अमेझॉन प्राईम व्हिडिओने आज त्‍यांचा पहिला मराठी चित्रपट ‘पिकासो’चा ट्रेलर सादर केला. या चित्रपटाचा विशेष वर्ल्‍ड प्रिमिअर १९ मार्च २०२१ रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर होणार आहे. राष्ट्रीय पुरस्‍कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक (Prasad Oak), बालकलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटात अस्‍वस्‍थ मद्यपी वडील व मुलाच्‍या नात्याची उत्तम कथा सादर करतानाच कोकणातल्या लोकजीवनाची आणि तिथल्या सुप्रसिद्ध अशा दशावतार कलेची झलक पाहायला मिळते.

शिलादित्‍य बोराद्वारे (Shiladitya Bora) निर्मित ‘पिकासो’चे दिग्‍दर्शन व सह-लेखन पदार्पणीय अभिजीत मोहन वारंग (Abhijeet Mohan Warang), तसेच सह-लेखक तुषार परांजपे (Tushar Paranjape) यांनी केले आहे. भारत आणि २४० देश व प्रदेशांमधील प्राईम सदस्‍य १९ मार्च २०२१ पासून फक्‍त अमेझॉन प्राईम व्हिडिओवर मराठी नाट्य ‘पिकासो’चा विशेष वर्ल्‍ड प्रिमिअर पाहू शकतात.

चित्रपटाच्‍या कथानकाबाबत बोलताना पदार्पणीय दिग्‍दर्शक व सह-लेखक अभिजीत मोहन वारंग म्‍हणाले, ”मला बालपणापासूनच दशावतार कलेने आकर्षून घेतले आहे. मला दशावताराला अस्‍सल व मूळ स्‍वरूपात दाखवणारा पहिला चित्रपट ‘पिकासो’ सादर करताना आनंद होतो आहे. या चित्रपटात वास्तविकता आणण्याचा माझ्यासह प्रत्येक कलाकाराचा पयत्न होता आणि त्यासाठी आम्ही वास्‍तविक ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. लोककथेनुसार लोककलेचा उगम तळकोकणाच्‍या वालावल शहरामधील लक्ष्‍मी-नारायण मंदिरामधून झाला आहे. तिथे आम्‍ही चित्रपटाचे शूटिंग केले. या चित्रपटासोबतच आम्ही कलाकाराच्‍या जीवनातील दैनंदिन आव्‍हानांना लोकांसमोर आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. सर्जनशीलतेची समर्पक, वेदनादायी, पण समाधानकारक प्रक्रिया म्‍हणजे स्‍वत:लाच प्रश्‍न विचारत समस्‍यांचा सामना करण्‍याच्‍या नवीन पद्धतींचा शोध घेणे.”

प्‍लॅटून वन फिल्‍म्‍सचे निर्माता शिलादित्‍य बोरा म्‍हणाले, ”मराठी चित्रपटसृष्‍टी ही भारतातील सर्वात प्रगतीशील चित्रपटसृष्‍टी असून तिने अलीकडील दशकामध्‍ये अनेक उल्‍लेखनीय चित्रपटांची निर्मिती केली आहे, याबाबत काहीच शंका नाही. यापैकी अनेक चित्रपटांची आंतरराष्‍ट्रीय समीक्षकांनी प्रशंसा केली आहे आणि भारतातील बॉक्‍स ऑफिस विक्रम मोडून काढले आहेत. ‘पिकासो’ हा असाच एक चित्रपट आहे, जो सर्व वयोगतील व सीमांपलीकडील प्रेक्षकांना प्रेरित करेल. प्‍लॅटून वन फिल्‍म्‍समधील आमच्‍या संपूर्ण टीमला अमेझॉन प्राईम व्हिडिओसोबत सहयोग करण्‍याचा आणि आमच्‍या स्‍वत:च्‍या लहानशा प्रयत्‍नामध्‍ये आणि त्यांच्या वैविध्‍यपूर्ण कथानकांमध्ये ‘पिकासो’ सारख्या कथांचे योगदान देण्‍याचा आनंद होत आहे. मी भारत आणि २४० देश व प्रदेशांमधील स्ट्रिमिंग सर्विसवर या चित्रपटाचे वर्ल्‍ड प्रिमिअर सादर होताना पाहण्‍यास खूपच उत्‍सुक आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विवादात सापडलेला ‘निशब्द’ चित्रपट; कमी वयाच्या अभिनेत्री सोबतच्या बोल्ड दृश्यांमुळे बिग बींवर नाराज होत्या जया बच्चन!

-साठच्या दशकातील ‘चॉकलेट हिरो’, ज्याचे संपूर्ण कुटुंब होते चित्रपट उद्योगात

-काय सांगता!! सलीम खान त्यांच्या मोकळ्या वेळात अर्धा-अर्धा तास बोलायचे राँग नंबरवर, पाच मुलांमुळे वाढले होते खूपच काम


Leave A Reply

Your email address will not be published.