Sunday, October 6, 2024
Home अन्य अभिनेता रिझवान अहमदला ऑस्कर अवॉर्डसाठी नामांकन; शबाना आझमी म्हणाल्या, ‘रिझवान मुसलमान…’

अभिनेता रिझवान अहमदला ऑस्कर अवॉर्डसाठी नामांकन; शबाना आझमी म्हणाल्या, ‘रिझवान मुसलमान…’

पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश अभिनेता रिझवान अहमद याला सर्वोत्कृष्ट अभिनेता कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. ‘साउंड ऑफ मेटल’ या चित्रपटातील त्याच्या शानदार अभिनयामुळे त्याला हे नामांकन मिळाले. अशाप्रकारे, रिझवान अहमद ऑस्करसाठी नामांकित होणारा जगातील पहिला मुस्लिम अभिनेता ठरला आहे. त्याच्या या कर्तृत्वाने प्रभावित होऊन, बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांनी एक ट्वीट केले आहे.

शबाना आझमी यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तो हे यश मिळविण्यात यशस्वी झाला आहे. याशिवाय दुसरे काही कारण नाही. रिझवान अहमदबद्दल शबाना आझमी यांनी केलेले ट्वीट खूप व्हायरल होत आहे. यावर अभिनेत्रीचे चाहते जोरदार प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.

शबाना आझमी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहले की, “रिझवान अहमद मुसलमान असण्यावर इतका जोर का दिला जात आहे? तो एक चांगला अभिनेता आहे. मला वाटते की, त्याच्या चांगल्या परफॉर्मन्समुळे त्याला हे यश मिळालं आहे. यामागे दुसरं कोणतंही कारण नाही. मीही त्याच्यासोबत ‘बांग्ला टाऊन बँक्वेट’ आणि ‘रिलॅक्टंट फंडामेंटलिस्ट’ या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे.”

याशिवाय, शबाना आझमी त्यांच्या अभिनयाशिवाय स्पष्ट मतांसाठीही ओळखल्या जातात. त्या नेहमी नवनवीन मुद्द्यांवर त्यांचे मत व्यक्त करत असतात. कामाबद्दल बोलायचे झाले, तर शबाना लवकरच स्वरा भास्कर आणि दिव्या दत्तासोबत ‘शीर खुरमा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहेत.

रिझवान अहमदबद्दल बोलायचे झाले, तर तो मुस्लिम अभिनेता होण्याव्यतिरिक्त आशियातील पहिला अभिनेता आहे, ज्याला ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीसाठी नामांकन देण्यात आले आहे. तो ‘द रोड टू गुआंटानमो’, ‘शिफ्टी’, ‘फोर लायन्स’, ‘तृष्णा’, ‘इल मॅनर्स’ आणि ‘द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट’ अशा स्वतंत्र चित्रपटात काम करण्यासाठी विशेष ओळखला जातो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडमध्ये गंभीर पात्र साकारत अभिनेता सुशांतने प्रेक्षकांच्या मनावर पाडली अभिनयाची छाप

-अमेझॉन प्राईम व्हिडिओकडून मराठी चित्रपट ‘पिकासो’च्‍या वर्ल्‍ड प्रिमिअरची घोषणा

-साठच्या दशकातील ‘चॉकलेट हिरो’, ज्याचे संपूर्ण कुटुंब होते चित्रपट उद्योगात

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा