Wednesday, August 6, 2025
Home बॉलीवूड जलवा! फॅशन स्टाइलसाठी ओळखल्या जाणाऱ्या करीनाचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल

जलवा! फॅशन स्टाइलसाठी ओळखल्या जाणाऱ्या करीनाचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल

‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या फॅशन स्टाइलने तिने इंडस्ट्रीत अनेक ट्रेंड सेट केले आहेत. तिने केलेली फॅशन ट्रेंड बनते. आत्तापर्यंत करिनाने असे अनेक चित्रपट केले आहेत, ज्यात तिची स्टाईल एक ट्रेंड बनली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फाेटाे आणि क्युट व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. चाहतेही तिच्या पाेस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. अशातच करीनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जाे साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे.

आपल्या आवडत्या स्टारच्या घराची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. करीनाच्या घराच्या बाल्कनीचा काही भाग तुम्ही तिच्या पोस्टमध्ये पाहिला असेल, जिथे अभिनेत्री योगा करताना दिसते. पण आता करीना () हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये ती चाहत्यांना तिच्या घराचा नवा कोपरा दाखवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री जमिनीवर बसली आहे. तिच्या मागे पुस्तकांच कलेक्शन दिसत आहे.

करीनाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती एका ब्रँडचे प्रमोशन करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये करीना सांगत आहे की, गुलाबी हा तिचा आवडता रंग आहे. सणासुदीच्या काळात तिला गुलाबी आणि चमकदार चप्पल कॅरी करायला आवडते. व्हिडिओमध्ये तिचे फुटवेअर कलेक्शन स्पष्टपणे दिसत आहे. करीनाच्या लोकेशनबद्दल बोलायचे झाले, तर ती जिथे बसली आहे तिथे तिच्या मागे पुस्तकांचे कलेक्शन दिसत आहे. यासोबतच एक फोटो फ्रेम देखील दिसत आहे, ज्यामध्ये माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम सैफ अली खानला ‘हम तुम’ चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देताना दिसत आहेत. पार्श्वभूमीत सैफ अली खानची नेमप्लेटही दिसत आहे.

करीना कपूरच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर करीना हंसल मेहताच्या क्राईम थ्रिलर चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच तिने शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला हाेता. या चित्रपटाव्यतिरिक्त, करीना सुजॉय घोषच्या ‘मर्डर मिस्ट्री’ मध्ये देखील दिसणार आहे जो प्रसिद्ध लेखक केगो हिगाशिनोच्या 2005 मधील सर्वाधिक विक्री झालेल्या जपानी कादंबरी ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ वर आधारित आहे. या चित्रपटात विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय करीना रिया कपूरच्या ‘वीरे द वेडिंग -2’ या चित्रपटात काम करणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा:
एकच नंबर! रणवीर सिंग अन् एनबीए प्लेयर यांचा ततड-ततड डान्स चर्चेत, व्हिडीओ व्हायरल

‘प्रजातंत्र’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, रितेश अन् काजल राघवानीचा हॉट रोमान्स चर्चेत

हे देखील वाचा