Sunday, December 3, 2023

खूपच वक्तशीर आहे करीना कपूर, नेहमी वेळेवर चित्रपटाच्या सेटवर पोहोचते अभिनेत्री

बॉलिवूड कलाकार त्यांच्या वेगवेगळ्या सवयींसाठी ओळखले जातात. जसे की सलमान खान (Salman Khan) त्याच्या राग आणि दानशूरपणासाठी, तर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांच्या वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. तसेच आमिर खान (Aamir Khan) त्याच्या परफेक्शनसाठी. या स्टार्समध्ये वेगळी ओळख निर्माण करणारी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) तिच्या उत्कृष्ट टाइम मॅनेजमेंटसाठी ओळखली जाते.

‘रिफ्युजी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या करीना कपूर खानचे नाव चित्रपटसृष्टीतील अशा कलाकारांपैकी एक आहे, जे अतिशय शिस्तप्रिय आहेत. करीनाने तिच्या वेळेचे व्यवस्थापन अशा प्रकारे केले आहे की, ती तिची रोजची कामे योग्य वेळी करते. तिला नेहमीच तिच्या चित्रपटांच्या सेटवर वेळेवर पोहोचायला आवडते. एका मुलाखतीत तिने स्वतः कबूल केले की, ती आठ तासांपेक्षा जास्त काळ चित्रपट शूट करत नाही आणि आठवड्यातून फक्त चार दिवस शूट करण्याचा प्रयत्न करते. (kareena kapoor khan very conscious about her time)

सध्या करीना कपूर ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. या चित्रपटात ती बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याआधीही या दोन्ही कलाकारांनी ‘३ इडियट्स’ आणि ‘तलाश’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘३ इडियट्स’ने ३०० कोटींहून अधिक कमाई केली होती. आता या जोडीचा तिसरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करतो हे पाहणे रंजक ठरेल. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा