वीरे दी वेडिंग सारखे सुपरहिट चित्रपट बनवणारी रिया कपूरने नुकताच तिचा नवरा करण बुलानीचा वाढदिवस साजरा केला. सध्या रिया कपूर पतीसोबत गोव्यात सुट्ट्यांची मज्ज घेत आहे. रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने एक वर्षा पाहिले तिचा प्रियकर करण बुलानीशी लग्न केले होते. लग्नानंतर रिया सोशल मीडियावर स्वतःचे आणि करणचे बरेच रोमँटिक फोटो शेअर करते. नुकतेच तिने तेथील काही लोकेशनवरील मनाेरंजक फाेटाे शेअर केले आहे. साेशल मीडियावर हे फाेटाे प्रचंड व्हायरल हाेत आहे.
रिया कपूरने गोवा गेटवेचे फोटो केले शेअर
रिया कपूर एक फिल्ममेकर आहे. सध्या ती पती करण बुलानीसोबत सुट्टायांचा आनंद घेत आहे. गोवा हे तिचे आवडते ठिकाण आहे. आता रिया कपूरने गोवा गेटवेचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने करण बुलानीच्या पूल टाइमचा व्हिडिओही शेअर केला आहे. याप्रसंगी तिने एक गाणेही गायले आहे. रिया कपूरने पोस्टवर लिहिले, “ऑक्टोबरमध्ये गोवा, नवीन आणि जुने प्रेम.’ यासोबतच तिने त्यावर 6 ऑक्टोबरची तारीखही टाकली आहे.
View this post on Instagram
रियाने पती करण बुलानीचा गोव्यात केला वाढदिवस साजरा
विशेष म्हणजे करण बुलानीचा वाढदिवस गोव्यात साजरा करण्यात आला. करण बुलानी 6 ऑक्टोबर रोजी 40 वर्षांचा झाला आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर रिया कपूरने तयारीची एक झलक शेअर केली. यामध्ये जेवणापासून ते व्यवस्थेपर्यंतच्या गोष्टींची झलक पाहायला मिळात आहे. तिने तिचा नवरा करण बुलानीचा केक कापतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. तिने लिहिले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा, डॉगी, डॅडी प्रियकर आणि वाढणारा जोडीदार. मला तुझ्यासोबत वाढायला आवडते.”
View this post on Instagram
सोनम कपूरनेही सोशल मीडियावर करणला शुभेच्छा दिल्यात. सोनमने स्वतःचा आणि करणचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा करण, बेस्ट जिजा झाल्याबद्दल धन्यवाद. चाळीशीतही तू छान दिसतोस.”
View this post on Instagram
याशिवाय अनिल कपूरसह कुटुंबातील इतर सदस्यांनीही करणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
शरद पवारांचे हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘सगळ्यात जास्त योगदान मुस्लिमांचेच…’
नेहा मलिकने ब्लू ड्रेसमध्ये केले बोल्ड फोटोशूट