‘माझा या गोष्टींवर विश्वास नाही’, म्हणत रिया कपूरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची मुलगी रिया कपूर इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध निर्माती आणि फॅशन डिझायनर म्हणून ओळखली जाते. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात ती लग्नाच्या बेडीत अडकली होती. त्यामुळे लग्नानंतर पहिलीच करवा चौथ साजरी करणार्‍या रियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मोठा संदेश लिहीत करवा चौथसाठी मला कोणीही संपर्क करु नये असे जाहीर केले आहे. रियाच्या या खुलाशाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, रिया कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक मोठा संदेश लिहताना मी करवा चौथ साजरी करणार नसून मला कोणत्याही ब्रँडने त्यासाठी संपर्क करु नये असे जाहीर केले आहे. या सणाच्या उद्देशाला मी आणि माझा पती करण सहमत नसल्याचेही तिने यावेळी स्पष्ट केले आहे.

Photo Courtesy: Instagram/rheakapoor

या पोस्टमध्ये रिया कपूरने लिहिले आहे की, “नमस्कार, करवा चौथच्या उपवासासाठी किंवा साजरा करण्यासाठी कृपया मला कोणीही संपर्क करु नये. यावर मी आणि करण विश्वास ठेवत नाही. असे नाही की, आम्ही त्या लोकांचा अनाआदर करतो जे हा दिवस साजरा करतात. हे फक्त माझ्यासाठीच नाही. परंतु ज्या गोष्टीवर माझा विश्वास नाही किंवा ज्या गोष्टींना मानत नाही अशा गोष्टींना पाठींबा देणे मला योग्य वाटत नाही. मी या सणाच्या प्रथेबद्दल सहमत नाही.”

याबद्दल पुढे रिया लिहते की, “काही लोक माझ्या या विचाराला मूर्ख म्हणत आहेत, पण मला असे वाटते की, आपण एकमेकांची काळजी करत असू तर आपल्याला चांगले असणे आवश्यक आहे. मी हे सगळ यासाठी लिहीत आहे की कोणीही अनोळखी व्यक्ती येऊन मला समजावतात की ‘मी मूर्ख आहे’ , ‘मला हे केले पाहिजे,’ हे माझे पहिले करवा चौथ आहे तर धन्यवाद!”

Photo Courtesy: Instagram/rehakapoor

दरम्यान रिया कपूर आणि करण बूलानी ऑगस्टमध्ये विवाहबंधनात अडकले. या घरगुती सोहळ्याला कुटुंब, मित्रपरिवार आणि निवडक मंडळी उपस्थित होती. लग्न सोहळा अनिल कपूर यांच्या मुंबईतील घरी पार पडला. रिया ही अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी तर अभिनेत्री सोनम कपूरची बहीण आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

Latest Post