बॉलिवूड आणि आता हॉलिवूडचीही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) नेहमीच चर्चेत असते. प्रियांका आई झाल्यापासून मातृत्त्व एन्जॉय करताना दिसते. मुलगी मालतीसोबतचे अनेक फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करते. यावेळी प्रियांका वेगळ्या कारणामुळे चर्चा रंगली आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अलीकडेच प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये प्रियंकाने तिच्या चाहत्यांना सोना रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात घेऊन जाते, तिथे ती तिच्या वेटर्सना काही गरम कबाब बनवण्यास मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसते. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडले आहे. प्रियांका स्वयंपाक करताना पाहून चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहे.
View this post on Instagram
प्रियांकाने पोस्ट केलेल्या व्हिडीओ शेअर करत म्हटले की, ‘सोना बिहाइंड द सीन्स फ्रॉम किचन ऑफ न्यूयॉर्क… खरं सांगायचे तर मला खूप गोष्टी आवडतात. सर्व चविष्ठ जेवणासाठी @harrynayak आणि @harry.nair यांचे आभार मानते. प्रियांका न्यूयॉर्कमधील फ्लॅटिरॉनमध्ये सोना नावाचे भारतीय रेस्टॉरंट चालवते. यामध्ये भारतातील अनेक लोकप्रिय पदार्थ मिळतात. तिच्या रेस्टॅरंटला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, प्रियांका तिच्या आगामी चित्रपट जी ले जरा द्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा महिलांवर आधारित चित्रपट 2011 मध्ये आलेल्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिला पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
झालं एकदाचं! ‘दृश्यम 2’ चित्रपटाचं शूटिंग संपलं; साळगावकर कुटुंबावर शूट केलं ‘हे’ दमदार गाणं
अर्रर्र! ब्लेड, सिमकार्ड, पॉलिथिनचे कपडे घालणाऱ्या उर्फी जावेदची इतकी आहे मालमत्ता