Sunday, June 23, 2024

झालं एकदाचं! ‘दृश्यम 2’ चित्रपटाचं शूटिंग संपलं; साळगावकर कुटुंबावर शूट केलं ‘हे’ दमदार गाणं

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता अजय देवगन सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘दृश्यम 2‘ मुळे चर्चेत आहे. अभिनेत्याच्या या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप आतुरतेनं वाट पाहत आहे. यादरम्यान चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार गाेव्यात एका गाण्यासाेबत चित्रपटाचे शूटिंग पुर्ण झाले आहे. हे गाणं चित्रपटातील साळगावकर कुटुंबावर चित्रित केले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाला घेऊन खूप उत्सुकता वाढली आहे. 

पुन्हा उघडेल केस 
हा चित्रपट 2015 मध्ये आलेल्या ‘दृश्यम’चा सिक्वेल आहे. या चित्रपटाबाबत बोलायचे झाले, तर या चित्रपटात विजय साळगावकरचे प्रकरण पुन्हा एकदा उघड होणार आहे. या चित्रपटात पोलीस आणि विजय यांच्यात पुन्हा एकदा जबरदस्त माइंड गेम पाहायला मिळणार आहे. ‘दृश्यम’ चित्रपटाची कथा 2 आणि 3 ऑक्टोबरवर खेळल्या गेली आहे. आता पुढील कथा सिक्वेलमध्ये दाखवण्यात येणार आहे. अजय देवगणने विजय साळगावकर यांची भूमिका साकारली आहे.

या दिवशी रिलीज हाेणार चित्रपट
‘दृश्यम 2’ चित्रपटात अजयशिवाय श्रिया सरन आणि इशिता दत्त महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटातील संगीत डीएसपी म्हणजेच देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे. त्याच वेळी, चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘दृश्यम’ चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. उत्तम अभिनय आणि सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटाने लोकांचे खूप मनोरंजन केले. अशा परिस्थितीत आता चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अजय देवगण दिसणार ‘थँक गॉड’मध्ये
माध्यामांतील वृत्तांनुसार, निर्मात्यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये या चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती. या चित्रपटाचा टीझर आधीच रिलीज झाला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ‘दृश्यम 2’ व्यतिरिक्त तो ‘थँक गॉड’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक इंद्र कुमार करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्रर्र! ब्लेड, सिमकार्ड, पॉलिथिनचे कपडे घालणाऱ्या उर्फी जावेदची इतकी आहे मालमत्ता

खेसारीला मिळाला धाेका! गायक पडला सेदाच्या प्रेमात; म्हणाला, ‘बारिश तो बहाना है’

हे देखील वाचा