Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड रणवीर अन् बॉस्केटबॉल स्टार शाक यांचा ‘खली बली…’ डान्स चर्चेत, पाहा भन्नाट व्हिडीओ

रणवीर अन् बॉस्केटबॉल स्टार शाक यांचा ‘खली बली…’ डान्स चर्चेत, पाहा भन्नाट व्हिडीओ

बाॅलिवूडचा लाेकप्रिय अभिनेता रणवीर सिंगने मागील काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष वेधले आहे. रणवीर हा बॉलिवूडचा एनर्जी किंग मानला जातो. अलीकडेच, रणवीरने माजी बास्केटबॉलपटू शाकिलसाेबत डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीरची दमदार एनर्जी पहायला मिळत आहे. ‘पद्मावत’मधील ‘खली बली हो गया है दिल…’ या गाण्यावर रणवीरने त्याला त्याच्यासोबत डान्स करण्यास भाग पाडले. शाकनेही रणवीरला चांगली साथ दिली आणि गाण्याच्या बोलानुसार डान्स करण्याचा प्रयत्न केला. आता शाक आणि रणवीरचा हा डान्सिंग व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नुकतेच रणवीर सिंग (Ranveer Singh) याने एनबीए अबू धाबी व्हिडिओ गेम्स 2022 मध्ये भाग घेतला. यादरम्यान रणवीरने टीव्ही स्टार स्टीव्ही हार्वे आणि बास्केटबॉल खेळाडू शाकसोबत खूप मस्ती केली. या बाँडिंगनंतर आता रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शाकसोबतचा एक डान्सिंग व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूपच मजेदार आहे.

या व्हिडिओमध्ये रणवीर सिंह शाकसमोर लहान मुलासारखा दिसत आहे. शाकची उंची 7 फूट 1 इंच आहे. त्यामुळे तो रणवीरपेक्षा खूप मोठा दिसत आहे. व्हिडिओमध्ये शाकही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे आणि रणवीर सिंगच्या एक्सप्रेशनची कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे. शाक आणि रणवीर दोघांच्याही चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. शाकने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

चात्यांसह सेलिब्रिटींनी केला कमेंटचा वर्षाव
रणवीर सिंगचा व्हिडिओ केवळ त्याच्या चाहत्यांनाच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींनाही खूप आवडला आहे. या व्हिडिओवर वरुण धवन, चित्रांगदा सिंग, विशाल ददलानी, आहाना कुमरा, मिनी माथूर, बादशाह इत्यादी अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. चाहते या व्हिडीओवर भरभरून लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

 याआधी रणवीर सिंगने एनबीए स्टार जियानिस एंटेटोकोनम्पो (Giannis Antetokounmpo) सोबतचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो ‘गोलियों की रासलीला राम लीला’ मधील ‘ततड तताड’ गाण्याची हुक स्टेप शिकवताना दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अब्दू रोजिकने सांगितले त्याच्या शाळेतील वाईट अनुभव, कमी उंचीमुळे शाळेतून काढले होते बाहेर

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचं प्रकरण थेट सायबर पोलिसांकडे; काय भानगड?

हे देखील वाचा