‘ते फोटो मॉर्फ केलेले…’, अभिनेता रणवीर सिंगचा मुंबई पोलिसांसमोर मोठा खुलासा

0
117
Ranveer-Singh
Photo Courtesy: Instagram/ranveersingh

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटची चर्चा अद्याप सिनेसृष्टीत सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटने बॉलिवूडमध्ये खळबळ माजवून दिली होती. एका मासिकासाठी रणवीरने हे फोटोशूट केले होते, ज्याची सिने जगतात प्रचंड चर्चा रंगली होती. या फोटोशूट नंतर रणवीरसिंगवर जोरदार टिका करण्यात आली होती. इतकेच नव्हेतर रणवीर विरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. आता या फोटोशूटबद्दल रणवीर सिंगने पोलिसांत नवीन खुलासा केला आहे. 

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत राहिला आणि त्याला खूप विरोध झाला. फोटोशूट प्रकरणी अभिनेत्याने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबानीत एक महत्त्वाचा खुलासा केला होता. या अभिनेत्याचे म्हणणे आहे की ज्या फोटोसाठी २६ जुलै रोजी मुंबईत अश्लीलतेच्या आरोपाखाली त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती, त्या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे. हा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला नसल्याचे रणवीर सिंगने म्हटले आहे.

अभिनेता रणवीर सिंग याने 29 ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात दावा केला होता की, हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला नाही. अभिनेत्याने सांगितले की, जे फोटो पेपर मॅगझिनचा भाग असल्याचे सांगितले जात आहे ते त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या सात फोटोंमध्ये नाही. त्या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे. अभिनेत्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवणाऱ्या याच फोटोच्या आधारे मुंबई पोलिसांनी अभिनेत्याविरुद्ध अश्लीलतेची तक्रार दाखल केली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी हे फोटो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले असून ते मॉर्फ केलेले आहे की नाही याची पुष्टी केली आहे. फोटोमध्ये छेडछाड झाल्याचे निष्पन्न झाले तर रणवीर सिंगला या प्रकरणात क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे. कारण या एका फोटोच्या आधारे त्याच्यावर अश्लीलतेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, “अभिनेत्याने त्याच्या निवेदनात म्हटले आहे की त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेली सात फोटो अश्लील नव्हती आणि त्याने अंडरवेअर घातले होते.” त्यांनी सांगितले की, तक्रारदाराने ज्या फोटोबाबत गुन्हा दाखल केला आहे तो फोटोशूटचा भाग नाही. फोटोशूट दरम्यान काढलेली सर्व फोटो त्याने आम्हाला दिली आहेत. पोलिसांनी त्याच्या इंस्टाग्राम पोस्टचीही तपासणी केली आहे, ज्यामध्ये तक्रारदाराचा फोटो नाही.

हेही वाचा – माला सिन्हा यांच्या मांडीवर बसलेल्या ‘या’ मुलाला ओळखले का? आज करतोय बॉलिवूडवर राज्य
चंदन प्रभाकरने सांगितले ‘द कपिल शर्मा शो’ सोडण्यामागील कारण, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
लहान वयातच ऋषी कपूर यांच्या मुलीला आलेल्या सिनेमाच्या ऑफर, नाकारून बनली ज्वेलरी डिझायनर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here