Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अय्याे! चाहत्याने ठेवला अभिनेत्रीच्या खांद्यावर हात अन् शेहनाज चिडून म्हणाली, ‘मैत्रीण समजला…’

बिग बॉस 13’  फेम शहनाज गिल लाेकप्रिय अभिनेत्री आहे. पंजाबची कॅटरिना कॅफ म्हणून ओळखली जाणाऱ्या शहनाजची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. ती जिथे दिसते तिथे तिच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अलिकडे असाच एक प्रकार घडला आहे. शेहनाज विमानतळावर स्पाॅट झाली आणि तिच्या चाहत्यांनी सेल्फी काढण्यासाठी रांगा लावल्या. मात्र, त्यादरम्यान असे काही घडले की युजर शहानाज चांगलीच ट्रेंडमध्ये आली आहे.

झाले असे की, शहनाज गिल (Shehnaaz Gill) विमानतळावर दिसली. ती पॅपराजीला पोज देत होती की, तिला पाहून चाहत्यांनी तिला घेरले. यानंतर एकामागून एक चाहते तिच्यासोबतचे फोटो क्लिक करू लागले. यादरम्यान, एक व्यक्ती आला आणि ताे चुकून शेहनाजच्या खांद्यावर हात ठेवयला जाणारच हाेता की, तितक्यात अभिनेत्री मागे सरखली. त्यानेही अभिनेत्रीला पाहून स्वत:ला थांबवले आणि माफी मागितली. मात्र, यानंतर दाेघांनीही फाेटाे क्लिक केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शहनाजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी दिल्या प्रतिक्रिया
शहनाज गिलने बाकी सर्वांसोबतही फोटोसाठी पोज दिली आणि जेव्हा ती तिथून निघायला लागली त्यावेळी ती त्याव्यक्तीला बघून म्हणाली, “तुला काय वाटल की, तुझी मैत्रीण आहे.” आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. यावर युजर आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. एकाने युजरने लिहिले की, “ती स्वतःची संरक्षक आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले की, “काही चाहते खूपच मूर्ख असतात.” एका युजरने, तर चक्क लिहिले की, “अरे भाऊ… चांगल्याने वाग, ती तुझा मैत्रीण नाही आहे.”

सुपरस्टार सलमान साेबत काम करणार शहनाज
शहनाज गिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. आता ती सुपरस्टार सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये दिसणार आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय पलक तिवारी, सिद्धार्थ निगम आणि राघव जुयाल हे देखील यात दिसणार आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पाचशेत काय काय करू’, म्हणत खेसारीने अभिनेत्रीलाच विचारला प्रश्न; भोजपुरी गाण्याची रंगलीये तुफान चर्चा
कपिलच्या इंग्रजीची खिल्ली उडवणाऱ्यांची काॅमेडियनने केली ‘ऐशी तैशी’, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा