लवकरच शोमध्ये परतणार शमिता; एकटी नव्हे, तर ‘बिग बॉस १३’चे ‘हे’ दोन स्पर्धकही करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

‘बिग बॉस १५’ सातव्या आठवड्यात पोहोचला आहे. अशामध्ये घरात अनेक नाती तयार होताना आणि बिघडताना दिसत आहेत. घरामध्ये आतापर्यंत तीन वाइल्ड कार्ड एंट्री झाल्या आहेत आणि अहवालांवर विश्वास ठेवला, तर लवकरच आणखी वाइल्ड कार्ड या घरात दाखल होतील. डोनल बिष्ट आणि विधी पंड्या, मूस जटाना ही वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेल्या काही स्टार्सची नावे आहेत. शमिता शेट्टी प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसच्या घरातून काही काळ बाहेर पडली होती. पण आता ती देखील लवकरच परतणार असल्याची बातमी आहे. 

शमिताची तब्येत आता ठीक आहे आणि ती लवकरच बिग बॉसच्या घरात पुन्हा प्रवेश करणार आहे. पण यावेळी शमिता बिग बॉसच्या घरात एकटी येणार नसून, ती प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन येईल. रिपोर्ट्सनुसार, शमिता शेट्टीसोबत घरात दोन नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन येणार आहे. शमितासोबत एन्ट्री घेणारे सदस्य डोनल बिश्ट किंवा विधी पंड्या नसून, ‘बिग बॉस सीझन १३’चे स्पर्धक देवोलीना भट्टाचार्जी आणि रश्मी देसाई आहेत. (bigg boss 15 shamita shetty will return to the house with wild cards know who will be those two members)

माध्यमातील वृत्तानुसार, ‘बिग बॉस १३’च्या प्रसिद्ध स्पर्धक रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून दिसणार आहेत. तसेच, या दोन सुंदर महिलांच्या आगमनाने, गेममध्ये केवळ ट्विस्ट आणि टर्नच दिसणार नाहीत, तर प्रेक्षकांना या शोमध्ये अनेक मनोरंजक गोष्टी पाहायला मिळतील.

दुसरीकडे, शमिता शेट्टीला गेल्या आठवड्यात प्रकृती खराब झाल्याने, काही दिवस घराबाहेर जावे लागले होते. मात्र, बिग बॉसने शमिताला कोणाशीही बोलणार नाही आणि बिग बॉसच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करेल, अशा सूचना देऊन बाहेर पाठवले होते. आता शमिताची आई सुनंदा शेट्टी यांनी अभिनेत्री शोमध्ये लवकरच परत येणार असल्याची पुष्टी केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती

-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

-‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता

Latest Post