Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड अरर! मान्नारानं पहिल्यांदाच केलं स्विमसूटमध्ये फोटोशूट; युजर म्हणाले, ‘गेलं दिवस…’

अरर! मान्नारानं पहिल्यांदाच केलं स्विमसूटमध्ये फोटोशूट; युजर म्हणाले, ‘गेलं दिवस…’

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयानं ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला इंडस्ट्रीत ‘देसी गर्ल म्हणूनही ओळखले जाते. ती तिच्या अभिनयासाठी आणि खास स्टाइलसाठी ओळखली जाते. तिची बहीण परिणीती चोप्राही आज बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. पण तुम्हला माहीत आहे की, तिची आणखी एक बहीण आहे, जी केवळ तिच्या फोटोंमुळे चाहत्यांचे लक्ष वेधते. ती दुसरी कोणी नसुन साऊथ चित्रपटात काम करणारी अभिनेत्री मन्नारा होय.

लाेकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिची बहीण मन्नारा (Mannara Chopra) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती स्वतःशी संबंधित काही ना काही पोस्ट कायमच चात्यांसोबत शेअर करते असते. ती खऱ्या आयुष्यात प्रियांका आणि परिणीती पेक्षा जास्त हॉट आणि बोल्ड आहे. अशातच तिने पहिल्यांदाच तिचा बिकिनीमधला नवा लूक शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर तिच्या मोनोकिनीमधील फोटो शेअर करताना, मन्नारा हिने लिहिले, “एल ए वाइब्स… श्रेय प्रियंका चोप्रा… हे माझे पहिले स्विमसूट शूट आहे.” फोटोंमध्ये अभिनेत्री पूलच्या बाजूला पोज देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mannara❤️ (@memannara)

मन्नाराच्या फोटोंवर लोक कमेंट करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, ”तू आता म्हातारी झाली आहेस.” तर दुसऱ्याने लिहिले, “आता तुमचे दिवस संपले” अशाप्रकारे लोक तिच्या पोस्टवर कमेंट करत आहेत.

मन्नाराने ‘जिद’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केले पदार्पण
बोल्डनेसच्या बाबतीत मन्नाराने परिणीती चोप्रालाही मागे टाकले आहे. मन्नारा ही प्रियांका आणि परिणीतीची चुलत बहीण आहे. मन्नाराने 2014 मध्ये ‘जिद’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने हिंदीसोबतच साऊथ सिनेमातही काम केले आहे.

मन्नाराने 40 हून अधिक टीव्ही शोमध्ये केले काम
मन्नाराने दिल्लीच्या समर फील्ड स्कूलमधून बीबीएची पदवी घेतली आहे. शिक्षणानंतर मन्नारा दिल्लीतुन मुंबईत आली आणि त्यानंतर मॉडेलिंगमध्ये करिअरला सुरुवात केली. तिने 40 हून अधिक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. एवढेच नाही, तर तिने कोरिओग्राफीही केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आर्थिक परिस्थतीमुळे अमिताभ बच्चन यांनी मरीन ड्राईव्हच्या बाकावर काढल्या आहेत अनेक रात्री, मग पुढे…

‘छोटो मियाँ बडे मियाँ’च्या वेळी अमिताभ बच्चनला खूप घाबरला होता गोविंदा, कारण जाणून व्हाल थक्क

हे देखील वाचा