Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

दमदार एन्ट्री! अश्विनी यार्डीच्या बर्थडे पार्टीत सिद्धार्थसाेबत पाेहचली कियारा, पाहा भन्नाट व्हिडिओ

बाॅलिवूड सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या अफेअरच्या चर्चे सर्वत्र रंगू लागल्या आहे. त्यांचा रोमान्सही जगभर प्रसिद्ध आहे. बॉलीवूडची ही गोंडस जोडी अनेकदा स्पाॅट झाली आहे. यासोबतच हे कपल अनेकदा बी-टाऊनमधील सर्व पार्टीमध्ये एकत्र हजेरी लावताना दिसते. अशातच बॉलीवूड निर्मात्या अश्विनी यार्दीच्या वाढदिवसाच्या पार्टीत हे जाेडपं एकत्र आले हाेते. त्यांचा हा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेतं आहे. ज्यावर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अश्विनी यार्दीच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स पार्टीला उपस्थित होते. शरद केळकर, कार्तिक आर्यन, अक्षय कुमार, सलमान खान, मसाबा गुप्ता, तसेच सलमान खानची बहीण अर्पिता खान तिचा पती आयुष शर्मा आणि अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा हे सर्व पार्टीत उपस्थित होते. याशिवाय पार्टीत सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी हे देखील उपस्थित हाेते. वाढदिवसाच्या पार्टीत या जाेडप्याच्या उपस्थितीने सर्वांनचे लक्ष वेधले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

साेशल मीडियावर सिद्धार्थ-कियाराच्या एन्ट्रीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एकत्र गाडीतून उतरून पार्टीत सहभागी होताना दिसत आहे. पार्टीसाठी, सिद्धार्थ डेनिम जॅकेटसह काळ्या पॅंटमध्ये दिसला, तर कियाराने पुन्हा एकदा आपल्या फॅशनने सर्वांना थक्क केले. कियाराने गोल्डन स्कर्टसह पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घालुन सर्वांचे लक्ष वेधले. या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. पार्टीत येण्यापूर्वी या जोडप्याने पॅपराझीला एकत्र पाेज देऊन फाेटाे देखील काढले.

सिद्धार्थ-कियारा बऱ्याच दिवसांपासून करत आहेत डेट 
माध्यमांतील वृत्तांनुसार, सिद्धार्थ-कियारा बर्याच दिवसापासून एकमेकांना डेट करत आहेत, तरीही दोघांनी त्यांच्या नात्याविषयी अधिकृत माहिती दिली नाही. अलीकडेच, जेव्हा सिद्धार्थ करण जोहरच्या शो ‘कॉफी विथ करण सीझन 7’ मध्ये अभिनेता विकी कौशलसोबत सामील झाला होता, तेव्हा करणने सिद्धार्थला कियाराबद्दल प्रश्न विचारला होता. शोमध्ये करण जोहरने सिद्धार्थला त्याच्या लव्ह लाईफबद्दल विचारले, “आता तू कियारा अडवाणीला डेट करत आहे, तर तुझ्या भविष्यात काही योजना आहेत का? कियारा अडवाणीशी तु लग्न करणार आहे का?” सिद्धार्थने उत्तर दिले की, “ती असेल, तर खूप छान होईल. पण तरीही मी सांगू शकत नाही.”

सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर सिद्धार्थ लवकरच ‘थँक गॉड’ या चित्रपटात दिसणार आहे.या चित्रपटात सिद्धार्थ व्यतिरिक्त रकुल प्रीत सिंग आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 24 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आम्रपाली दुबेने नागरिकांना शिकवला जिवणाचा पाठ, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

आई-वडील होताचं नयनतारा आणि विघ्नेश अडचणीत, तामिळनाडू सरकार सरोगेसीची करणार चौकशी

हे देखील वाचा