Saturday, April 20, 2024

‘कबीर सिंग’च्या थप्पड सीनवर कियारा अडवाणीचे वक्तव्य; म्हणाली, ‘तुम्ही जेव्हा प्रेमात असता तेव्हा…’

कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि शाहिद कपूर(Shahid Kapoor) यांचा ‘कबीर सिंग’ चित्रपट रिलीज होऊन तीन वर्षे झाली आहेत. कियाराने चित्रपटातील वादग्रस्त थप्पड दृश्याबाबत पुन्हा एकदा बचाव केला आहे. कियारा अडवाणी ही बॉलिवूडची सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे, ती सतत हिट चित्रपट देऊन चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. कियाराचा अभिनय असो, फॅशन सेन्स असो, तिच्या लूकवर सर्वांचेच मन हरखून जाते. ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या कियारा आडवाणीला खरी ओळख ‘कबीर सिंग’ या चित्रपटामुळे मिळाली असं म्हटलं तरीही चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटात कियारीने अभिनेता शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर केली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

कधी चित्रपट हे समाजाला आरसा असतात तर कधी समाजाला संदेश देतात. परंतु चित्रपटाचे मुख्य उद्दिष्ट मनोरंजन हा आहे. पण कधी कधी चित्रपटातील एखादे दृश्य या सर्व गोष्टींना न्याय देऊ शकत नाही आणि प्रेक्षकांचे लक्ष तिथेच अडकून जाते. शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटातील थप्पड सीनही असाच आहे. चित्रपटात थप्पड मारल्यानंतरही कियारा शाहिदकडे परत जाते. या दृश्यामुळे चित्रपटावर प्रचंड टीका झाली होती. एकविसाव्या शतकात तरुणांना असा सीन पचवणं कठीण झाले .

थप्पड मारण्याच्या दृश्यावर जोरदार टीका झाली
‘कबीर सिंग’ रिलीज होऊन तीन वर्षे झाली तरी कियारा आडवाणी या चित्रपटाच्या आणि तिचा पात्र प्रितीच्या समर्थनार्थ उभी आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘कबीर सिंग’ हा त्याच्याच तेलगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक होता. ‘कबीर सिंग’ही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, पण ‘पुरुषत्व’ला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याबद्दल त्यावर जोरदार टीका झाली.

कियारासाठी नेहमीच एक प्रेमकथा असेल
नुकत्याच एका माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कियाराने सांगितले की, या चित्रपटाचा बचाव केला आणि सांगितले की हा सिनेमा तिच्यासाठी नेहमीच एक प्रेमकथा असेल. शाहिद ज्या चित्रपटात तिला थप्पड मारतो ते दृश्य अतिशयोक्तीपूर्ण असल्याचेही तिने म्हटले आहे.

प्रेमात काही गोष्टी विसरतात
‘कबीर सिंग’ बद्दल माध्यमांशी बोलताना कियारा म्हणाली की, “प्रेम ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये प्रेम तुम्हाला आयुष्यातील काही गोष्टी विसरण्याची परवानगी देते. नाती खूप गुंतागुंतीची असतात आणि जेव्हा कोणी कोणाची फसवणूक करते, अपमान करते किंवा थप्पड मारते तेव्हा तिसर्‍या व्यक्तीला, अगदी माझ्यासाठी, त्यांना त्या नात्यातून बाहेर येण्यास सांगणे सोपे असते. पण त्या रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या दोनच लोकांना खरे वास्तव समजते”.

कियारा आडवाणी या थप्पडच्या दृश्यावर पुढे म्हणाली की, “इंटरव्हल सीनमध्ये त्या थप्पडनंतर प्रीती कबीरला सोडून जाते. तू त्याला पाहिले नाहीस? तू त्याला विसरलीस? सत्य हे आहे की, शेवटी जेव्हा तो तिची समजूत घालण्यासाठी येतो तेव्हाच ती त्याच्याकडे परत जाते.” कियाराच्या मते, प्रेमात असेच होते. ती म्हणाली की, लोकांनी संपूर्ण चित्रपटातील केवळ एका दृश्यावर चर्चा केली, म्हणजेच त्यांनी संपूर्ण चित्रपट पाहिला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

दुःखद ! पॉपस्टार ओलिविया न्यूटन जॉनचे ७३ व्या वर्षी निधन, स्तनाच्या कर्करोगाने होत्या त्रस्त

लहान असल्यापासूनच महेश बाबू आहे स्टार, वडिलांच्या ‘या’ अटीमुळे ९ वर्ष सोडली होती इंडस्ट्री

प्रख्यात मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन, कलाविश्वावर शोककाळा | Pradeep Patwardhan

हे देखील वाचा