Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी टीव्ही इंडस्ट्रीला ठोकला रामराम, पंजाबी अन् बॉलिवूड इंडस्ट्रीत करणार पदार्पण

टेलिव्हिजन एक असे माध्याम आहे ज्यामुळे कलारांना घराघरामध्ये ओळख मिळते. टीव्ही क्षेत्रातील कलाकारांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या दमदार अभिनयामुळे त्यांची अनेक ठिकानी छाप पडलेली आसते. मनोरंजन क्षेत्रातील असेच अनेक कलाकार आहेत,ज्यांनी फक्त छोट्या पडद्यावरच नाही तर बॉलिवूडमध्येही आपली धमक दाखवली आहे. मात्र, अशा मोठ्या इंडस्ट्रीमध्ये टिकूण राहणे फारच कठीण असते. आज आपण अशाच कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत जे टीव्ही कलाकार चित्रपटामध्ये पदर्पण करणार आहेत.

जॅस्मिन भसीन
अभिनेत्री जॅस्मिन भसीन (Jasmine Bhasin) ही टीव्ही क्षेतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. हिने अनेक मालिकांमध्ये आपली छाप सोडली आहे. तिने नुकतंच ‘हनीमून’ चित्रपटातून पंजाब इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून ती पंजाबचा गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवाल याच्यासोबत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट कौटुंबिक कॉमेडी चित्रपट आहे, जो 25 ऑक्टोंबर दिवशी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी जॅस्मिन पंजाबी गाण्यामध्ये दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jasmin Bhasin (@jasminbhasin2806)

जन्नत जुबेर 
लहान वयातच ‘फुलवा’ आणि ‘आशिकी’ सारख्या मालिकांमध्ये आपली छाप सोडणारी अभिनेत्री जन्नत जुबेर (Jannat Juber) हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने आपल्या दमदार अभिनयाने टीव्ही क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आता तिला मालिकामध्ये नाही, तर मोठ्या पडद्यावर काम करायचंय. आता ही अभिनेत्री लवकरच पंजाबी ‘कुलचे छोले’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. यामध्ये दिलराज ग्रेवाल मुख्य भुमिकेत दिसणार असून हा चित्रपट 11 नेव्हेंबर दिवशी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

धीरज धूपर
कुंडली भाग्य मालिकामधून करण नावाच्या भुमिकेने प्रसिद्ध अणारा धीरज धूपर (Dheeraj Dhupar)हा देखिल पंजाबी इंडस्ट्रीमझध्ये आपले नशीब चमकवण्याचा प्रयत्न करत आहे. माध्यमातील वृत्तानुसार धीरज लवरच पंजाबच्या बिग बजेट चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची शूटिंग पंजाब आणि अमेरिकामध्ये होण्याची शक्यता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by DheeRAJ Dhoopar (@dheerajdhoopar)

सरगुन मेहता
पंजाबी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री सरगुन मेहता (Sargun Mehta) टीव्ही अभिनेता रवी दुबे (Ravi Dubey) याची पत्नी आहे. ती ’12/24 करोल बाग’ या मालिकाने अमाप प्रसिद्धी मिळवली. तिने पंजाबमध्ये अनेक चित्रपट, गाण्यांच्या व्हिडिओमध्ये काम केले आहे. आता सगरुन ‘कठपुतली’ या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sargun Mehta (@sargunmehta)

बॉलिवूडसारख्या इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार येतात आणि जातात. मात्र, तिथे आपली छाप सोडणं आणि इंडस्ट्रीमध्ये पाय टिकवून ठेवणं खूपच अवघड आहे. टीव्ही क्षेत्रातील हे कलारही किती दिवस आपली ओळख निर्माण करतील हे पाहणे खूप रंजक अणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मिली’ चित्रपटातील जान्हवी कपूरचा फर्स्ट लूक आउट, टीझर पाहून व्हाल थक्क
खुशखबर! मिर्झापुर वेब सिरिजचा तीसऱ्या भागाला मिळाली सुटका, न्यायालयाने तक्रारीवर केले..

हे देखील वाचा