Thursday, March 28, 2024

कधी लग्न करणार जॅस्मिन भसीन आणि अली गोनी? अभिनेत्रीने सांगितला संपूर्ण प्लॅन

टीव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीन (Jasmin Bhasin) आणि अली गोनी (Aly Goni) हे लोकप्रिय स्टार जोडप्यांपैकी एक आहेत. ‘खतरों के खिलाडी सीझन ९’ मध्ये दोघे एकमेकांना भेटले होते आणि त्यानंतर दोघे मित्र झाले. ‘बिग बॉस १४’ मध्ये या जोडप्याने त्यांचे नाते अधिकृत केले आणि तेव्हापासून दोघेही रिलेशनशिप गोल देताना दिसत आहेत. आता अलीकडेच जॅस्मिन भसीनने बॉयफ्रेंड अली गोनीसोबतच्या तिच्या लग्नाबद्दल उघडपणे बोलले आहे आणि पुढे काय योजना आहेत हे देखील सांगितले आहे.

जॅस्मिन भसीन आणि अली गोनी यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते आणि दोघांनी कायम सोबत राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान जॅस्मिन भसीनने अली गोनीसोबतच्या तिच्या लग्नाबद्दल बोलताना सांगितले की, त्यांचे नाते खूप चांगले चालले आहे आणि सध्या दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत. अली गोनीसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “आम्हाला काम करायचे आहे आणि आमची स्वप्ने साकार करायची आहेत, सध्या तरी दोघांचा लग्नाचा कोणताही विचार नाही.” (jasmin bhasin speak about her marriage with bf aly goni)

अलीसाठी आणखी पाच वर्षे पाहू शकते वाट
यादरम्यान जॅस्मिनने तिच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, तिने अलीसाठी तीन वर्षे वाट पाहिली आणि कधीही तिच्या भावना त्याच्यावर लादल्या नाहीत. ती म्हणाली, “मी जुन्या जमान्यातील रोमँटिक मुलगी आहे. मी अलीसाठी आणखी पाच वर्षे वाट पाहू शकते.”

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री जॅस्मिन टीव्हीसोबतच पंजाबी चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिचा ‘हनीमून’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट यावर्षी २५ ऑक्टोबरला रिलीझ होणार आहे. या चित्रपटात जॅस्मिनसोबत गिप्पी ग्रेवाल दिसणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा असेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा