Wednesday, April 1, 2026
Home अन्य ‘सुंदर’नंतर आता ‘आत्माराम भिडे’ही सापडला कोरोनाच्या विळख्यात; तर ‘सोढी’ने केली लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना

‘सुंदर’नंतर आता ‘आत्माराम भिडे’ही सापडला कोरोनाच्या विळख्यात; तर ‘सोढी’ने केली लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही एक लोकप्रिय टीव्ही मालिका आहे, जी नेहमीच चर्चेत असते. पण, या दिवसात मालिका चर्चेत येण्यामागील कारण काहीतरी वेगळेच आहे. खरं तर, या मालिकेतील कलाकार सध्या अडचणीत सापडले आहेत.

नुकतेच ‘तारक मेहता का उलटा चष्मा’च्या ‘सुंदर’चा म्हणजेच मयूर वकानीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर ‘आत्माराम भिडे’ म्हणजेच अभिनेता मंदार चांदवडकरसुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. अशा परिस्थितीत, दोघांचे सहकारी कलाकार ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

मंदार चांदवडकर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर, ‘तारक मेहता उलटा चष्मा’चा जुना ‘सोढी जी’ म्हणजेच, गुरुचरण सिंग सोढीने त्याच्याशी बोलून त्याच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली. गुरुचरणने मंदारशी व्हिडिओ कॉलवर बोलतानाचा एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने आपल्या मित्र लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिले, “मॅन्डी: मंदार द ग्रेट लवकरच बरे व्हा आणि तुमच्यासाठी मनापासून प्रार्थना, शिक्षक भाऊ.” गुरुचरण सिंगच्या या पोस्टवर कमेंट्स करत, चाहतेही मंदार चांदवडकरला ठीक होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत आणि लवकर प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थनाही करत आहेत.

अलीकडेच मंदार चांदवडकरला कोरोना विषाणूची लागण झाली. ज्यामुळे तो सध्या शूटिंगपासून लांब आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने सांगितले की, तो बरा असून डॉक्टरांनी दिलेल्या नियमांचे पालन करत आहे. यासह, त्याने चाहत्यांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्याचे आवाहन देखील केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंडियन आयडल’ शोमध्ये सवाई भट्टनंतर सायली कांबळेची गरिबी ठरतेय वादाचा विषय; प्रेक्षकांनी लावला जोरदार टोला

-अभिनेत्री पूजा बेदीच्या ‘या’ कंडोम जाहिरातीने उभा ठाकला होता वाद, दूरदर्शनवर केली होती बंद, पाहा बोल्ड फोटो

-अभिमानास्पद! बिग बी’ ठरले ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय

हे देखील वाचा