टेलिव्हिजनवरील काही मालिका खूपच प्रसिद्ध होतात. तेवढेच त्या प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडतात. सोनी टीव्हीवरील इंडियन आयडल हा रिऍलिटी शो खूपच चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धक आपल्या आवाजाने प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण करत आहेत, तर काही स्पर्धकांवर खोटं बोलण्याचा आरोप लावला जात आहे. आपल्या मनमोहक आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा स्पर्धक सवाई भट्ट आणि इंडियन आयडल हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. यानंतर आता सायली कांबळेवरून नवा वाद उभा ठाकला आहे.
इंडियन आयडल या शोमधील सायली कांबळे हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सायली दिग्गज गायक सुरेश वाडकर यांच्यासोबत गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनी खूपच कमेंट केल्या आहेत. सोबतच हा प्रश्न उभा केला आहे की, सुरेश वाडकर यांच्यासोबत स्टेज शेअर करणारा व्यक्ती कोणी सामान्य असू शकत नाही.
नुकतेच काही दिवसांपूर्वी अभिनेता जॅकी श्रॉफ हे इंडियन आयडलच्या मंचावर आले होते, तेव्हा सायलीने सांगितले की, ती देखील जॅकी श्रॉफप्रमाणे एका चाळीत राहत आहे. त्यावरून प्रेक्षकांना असा अंदाज लावला आहे की, जर ही सुरेश वाडकर यांच्यासोबत स्टेज शेअर करू शकते तर ही एवढी गरीब कशी असू शकते?
याआधी देखील इंडियन आयडॉलच्या मंचावर सवाई भट्ट हिला गरीब दाखवले होते आणि नंतर गीतकार संतोष आनंद यांच्या लाचारीचा फायदा घेऊन टीआरपी वाढवण्यासाठी प्रयत्न केला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भोजपुरी होळीगीतांची धमाल कायम! ‘निरहुआ’चं नवीन गाणं जबरदस्त व्हायरल