बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनात सामील झाली आहे. इराणमध्ये महसा अमिनीच्या हत्येच्या निषेधार्थ तिने केस कापले. उर्वशी रौतेलाने स्वतः तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर करून चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री निळ्या रंगाच्या सूटमध्ये जमिनीवर बसलेली दिसत आहे, तर समोर बसलेला एक व्यक्ती तिचे केस कापताना दिसत आहे. उर्वशीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे.
उर्वशी (urvashi rautela) हिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “केस कापलेत ..इराणी महिला आणि त्या मुलींच्या समर्थनार्थ मी माझे केस कापत आहे, ज्यांनी इराणी मॉरल पोलिसांनी अटक केल्यानंतर महसा अमिनीच्या मृत्यूच्या निषेधार्थ हत्या केली. यासोबतच उत्तराखंडमधील 19 वर्षीय अंकिता भंडारी या मुलीसाठी.. महिलांचा आदर करा, ही महिला चळवळीची जागतिक प्रतिमा आहे.”
View this post on Instagram
उर्वशी रौतेलाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “केस हे महिलांच्या सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. सार्वजनिक ठिकाणी केस कापून, स्त्रिया हे दाखवत आहेत की, त्यांना समाजाच्या सौंदर्य मानकांची पर्वा नाही आणि ते कसे कपडे घालतात किंवा कसे वागतात हे ठरवू देत नाहीत. जेव्हा स्त्रिया एकत्र येतात आणि एका महिलेच्या मुद्दायाला संपूर्ण नारी जातीचा मुद्दा मानतात तेव्हा फेमिनिज्ममध्ये एक नवीन जाेश दिसताे.”
इराणमधील प्रकरणाची सुरुवात सप्टेंबर 22मध्ये महसा अमिनीच्या अटकेपासून झाली. नीट हिजाब न घातल्याने मॉरालिटी पोलिसांनी अमिनीला ताब्यात घेतले. मेहसा अमिनी पोलीस ठाण्यात बेशुद्ध पडल्या होत्या आणि त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता.अमिनीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असून तिच्यासोबत कोणतेही गैरवर्तन झाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर इराणमधील अनेक शहरात, आणि गावांमध्ये निदर्शने सुरू आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! नयनतारा अन् विग्नेशचं 6 वर्षांआधी झालंय लग्न? जाणून घ्या खरं काय ते
विवाहित असूनही राज बब्बर पडले होते ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात; पुढे अशाप्रकारे थाटला होता संसार