Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

कॅप्टन शिव ठाकरेच न ऐकल्याने बिग बाॅस भडकले, प्रियांकाला झाली शिक्षा, पाहा व्हायरल व्हिडिओ

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त ‘बिग बॉस 16‘ शाे दिवसेंदिवस मजेशीर होत आहे. डेंग्यूमुळे सलमान खान आजारी असून तो बरा होत आहे. दरम्यान, करण जोहर वीकेंड का वार होस्ट करताना दिसत आहे. आता कॅप्टन शिव ठाकरे आणि प्रियांका चौधरी यांच्यात वाद झाला आहे. कलर्स टीव्हीने एक प्रोमो जारी केला आहे. यामध्ये दोघेही एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

शिव ठाकरे प्रियांका चौधरीला पेटीत बंद हाेण्याची देताे शिक्षा 
शिव ठाकरे (shiv thackeray) याला प्रियांका चौधरी (priyanka chaudhary) हिच्या कडून काहीतरी जाणून घ्यायचे असते, त्यावर ती त्याला उलट उत्तरे देते.  भांडनानंतर थोड्यावेळानी बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना शांत करताे आणि सांगताे की, “जर कॅप्टनचे म्हणणे पाळले जात नसेल, तर कॅप्टन त्याबद्दल त्याला शिक्षा देऊ शकतो. यावर शिव ठाकरे प्रियांका चौधरीला डब्यात बंद करण्याची शिक्षा देताे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

प्रियांका चौधरी निराश
याआधीही एक व्हिडिओ रिलीज झाला होता, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य प्रियांका चौधरीवर पाण्याचा वर्षाव करताना दिसत आहेत. त्याचबरोबर मन मोकळे करा, असा संदेशही ते देत आहेत. प्रियांका चौधरीही घरच्यांच्या बोलण्याने निराश दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

प्रियांका चौधरी अंकित गुप्तासोबत डान्स करताना दिसली
यासाेबतच आणखी एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये प्रियांका चौधरी अंकित गुप्तासोबत चन्ना मेरेया गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. प्रियांका चौधरी आणि अंकित गुप्ता यांचा डान्स खूप पसंत केला जात आहे. करण जोहरने या गाण्यावर डान्स करण्यासाठी दोघांना टास्क दिला आहे. दोघेही डान्स करताना छान दिसत आहे.

सलमान आधी या सेलिब्रिटींनी केले बिग बाॅसचे हाेस्ट
बिग बॉसची सुरुवात 2006 साली छोट्या पडद्यावर झाली. यापूर्वी हा शो अर्शद वारसी, शिल्पा शेट्टी, फराह खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांसारख्या सेलिब्रिटींनी देखील होस्ट केला आहे, परंतु 2010 पासून सलमान या शोचा होस्ट आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
एकतावर कोसळलं संकटांचा डोंगर, तीन महिन्यांपासून जवळचा व्यक्ती दूर, सरकारकडे केली मदतीची याचना

गंडवलं रे! स्वयंवर विजेता आकांशा पुरी हिन लग्नासाठी केली मनाई

हे देखील वाचा