Friday, April 19, 2024

‘बिग बॉस 16’मध्ये येणार वादळ! दोन नवीन स्पर्धकांची झालीय एन्ट्री; एक पॉलिटिशन, तर दुसरा रॅपर

चाहते सध्या छोट्या पडद्यावरील एका शोसाठी खूपच उत्सुक आहेत. या शोने प्रीमिअरपूर्वीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा शो म्हणजेच प्रसिद्ध पण तितकाच वादग्रस्त असलेला ‘बिग बॉस‘ शो होय. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर हा शो सोळाव्या पर्वात पोहोचला आहे. या शोचे 16वे पर्व चाहत्यांच्या भेटीला आले आहे. या शोचा ग्रँड प्रीमिअर शनिवारी (दि. 01 ऑक्टोबर) होणार आहे. या शोमधील स्पर्धकांना पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही सज्ज झाले आहेत. ‘बिग बॉस 16’मध्ये दिसणाऱ्या स्पर्धकांची यादी शुक्रवारी सायंकाळी समोर आली आहे. यामध्ये एकूण 14 कलाकारांचा समावेश होता. आता यामध्ये आणखी दोन नावे जोडली गेली आहेत.

शोमध्ये सहभागी होणार 16 स्पर्धक
‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) या शोमधील स्पर्धकांच्या अंतिम यादीमध्ये राजकारणी अर्चना गौतम (Archana Gautam) आणि रॅपर एमसी स्टॅन (M C Stan) यांच्या नावाचा समावेश झाला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सलमान खान (Salman Khan) याने या दोन नवीन स्पर्धकांसोबत शुक्रवारी (दि. 30 सप्टेंबर) शूटिंग केली होती. यासोबतच बिग बॉसचमध्ये यावेळी 14 ऐवजी 16 स्पर्धक एन्ट्री करणार आहेत.

कोण आहे एमसी स्टॅन?
रॅपर एमसी स्टॅन हा पुण्याचा रहिवासी आहे. त्याने कव्वाली गायक म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली होती. यामधूनच तो इंटरनेट सेन्सेशन बनला. एमसी स्टॅनचा प्रोमोदेखील समोर आला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये तो सलमान खानसोबत बोलतानाही दिसत आहे. त्याने सलमानला म्हटले की, त्याला ‘बस्ती का हस्ती’ असे बोलावले जाते. सोबतच त्याचे नाव अर्धा राक्षस आणि अर्धा माणूस आहे. स्टॅनला पाहून आणि त्याच्याशी बोलल्यानंतर सलमान म्हणाला की, “मी 12 वर्षांपासून हा शो होस्ट केला आहे. मात्र, असा आयटम यापूर्वी कधी पाहिला नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by MC STΔN ???? (@m___c___stan)

प्रसिद्ध व्यक्ती आहे अर्चना गौतम
अर्चना गौतम हिच्याबद्दल बोलायचं झालं, तर ती मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने अनेक सिनेमात काम केले आहे. याव्यतिरिक्त तिने अनेक सौंदर्य स्पर्धाही जिंकल्या आहेत. अर्चनाने हस्तिनापूरमधून राजकारणात पाऊल ठेवले होते. तिला शोमध्ये पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Archana Gautam (@archanagautamm)

इतर स्पर्धक
शोमधील इतर स्पर्धकांबद्दल बोलायचं झालं, तर ‘बिग बॉस 16’ यावर्षी दिग्दर्शक साजिद खान, अभिनेत्री टीना दत्ता, सृजिता डे, निम्रत कौर अहलूवालिया, प्रियांका चाहर चौधरी, अंकिता गुप्ता, सुंबुल तौकीर खान, गौतम विग आणि शालीन भनोट हे कलाकार दिसणार आहेत. यासोबतच मिस इंडियाची विजेती मान्या शर्मा, भोजपुरी अभिनेत्री सौंदर्य शर्मा, बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे, तसेच फोक डान्सर गौरी नागौरी आणि गायक अब्दू रोजिकही दिसणार आहे. नवीन कलाकारांना बिग बॉसमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
घटस्फोटाच्या बातम्यांमध्येच दीपिका अन् रणवीरची ‘तसली’ चॅट आली समोर, तुम्हीही वाचाच
बापरे! ब्रेकअप होऊनही रश्मिका मारते एक्स बॉयफ्रेंडच्या घरी चकरा, स्वत:च केला खुलासा

हे देखील वाचा