टीव्ही मालिका आणि चित्रपटात काम करणाऱ्या जवळपास सर्वच अभिनेेत्री सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचणाऱ्या या अभिनेत्री पारंपारिक लूकसोबतच हॉट आणि बोल्ड फोटोही शेअर करताना दिसतात. काही अभिनेत्रींनी तर आपल्या फिटनेसकडे लक्ष देऊन आपली बॉडी एकदम जबरदस्त बनवली आहे. त्यांच्याकडे पाहिले तर त्यांचे वयही जास्त असल्याचे दिसून येत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ‘कसोटी जिंदगी की’ फेम श्वेता तिवारी. मालिकेत साडी आणि सूटमध्ये दिसणारी श्वेता सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे चर्चेत असते. नुकतेच तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर बोल्ड फोटो शेअर केले. जे पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
श्वेताही आपल्या तब्येतीची काळजी घेते. २ मुलांची आई असूनही ती आता ४० वर्षांच्या वयातही ती सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना टक्कर देते.
तिचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. या ट्रान्सफॉर्मेशननंतर श्वेता आपले अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ऍब्ज फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने प्रिंटेड फॉर्मल सूट घातला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे भल्या भल्या अभिनेत्रींना लाजवतील असे तिचे ऍब्जही यामध्ये पाहायला मिळत आहेत.
श्वेताच्या या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण तिच्या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत. टीव्ही अभिनेता करणवीर वोहराने फायर इमोजी कमेंट करत लिहिले की, ‘ऍब्स मॉमी.’ याव्यतिरिक्त एका चाहत्याने लिहिले की, ‘ऍब्ज वाली मुलगी.’ आणखी एका चाहत्याने लिहिले की, “उफ्फ हॉटनेस.”
याव्यतिरिक्त दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, ‘दिवसेंदिवस तरुण होत आहे, वय रोखले आहे.’
अभिनेत्री सौम्या टंडननेही श्वेताच्या या फोटोवर ट्वीट केले आहे. तिने लिहिले की, ‘तुझी मेहनत तुझ्या शरीरावर दिसत आहे. मम्मी गर्जना करत आहे. ‘
श्वेताच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सबद्दल बोलायचं झालं, तर तिचे इंस्टाग्रामवर १.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. श्वेतानेे आपल्या वजन कमी करण्याबद्दल सांगितले होते की, हे खूप कठीण असते. यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. सोबतच प्रशिक्षक आणि पोषण तज्ञांचा विशेष सल्ला घेतला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आहा! ‘५२ गज का दामन’ गाण्यावर ‘शालू’ने लावले जोरदार ठुमके, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
-नीतू कपूर यांनी केला ऋषी कपूर यांच्यासोबतचा न्यूयॉर्कचा व्हिडिओ शेअर, एकदा तुम्हीही घ्या पाहून










