Thursday, June 26, 2025
Home बॉलीवूड कोरोनाने विस्कटले तिचे जीवन; अमिताभ बच्चन, रणबीर कपूरसोबत काम करणारी मुलगी आता विकतेय मोमोज

कोरोनाने विस्कटले तिचे जीवन; अमिताभ बच्चन, रणबीर कपूरसोबत काम करणारी मुलगी आता विकतेय मोमोज

कोरोना महामारी सर्वात विनाशकारी आपत्ती घेऊन आली आहे. बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला, तर अनेकांनी जिवंत असून सर्व काही गमावले. व्यवसाय काय आणि रोजगार काय, सर्व काही संपले आहे. अशीच एक कहाणी आहे एका मुलीची. अशी मुलगी जिने एकेकाळी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. ती आहे महिला कॅमेरापर्सन सुचिस्मिता राउत्रे.

कोरोनाच्या काळात सुचिस्मिता राउत्रे ओडिशामध्ये मोमोज विकताना दिसली आहे. एकेकाळी मोठमोठ्या चित्रपटांमध्ये कॅमेऱ्याच्या मागे आपले कौशल्य दाखविणारी सुचिस्मिता, आता मोमोज विकून दिवसाला 300 ते 400 रुपये कमावत आहे.

तिच्यानुसार, लॉकडाऊन होण्यापूर्वी तिचे आयुष्य अगदी रुळावर चालले होते. कामही येत होते आणि नवीन संधीही दिसू लागल्या होत्या. पण एका विषाणूने तिच्या आयुष्यात असा स्पीड ब्रेकर लावला की, तिचे कामही सुटले आणि आता तिला मोमोज विकावे लागत आहेत.

माध्यमांशी बोलताना, सुचिस्मिताने याबद्दल सर्वकाही सविस्तरपणे सांगितले. ती म्हणाली, “शिक्षण संपल्यानंतर मी ओडिया साइन इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मग 2015 मध्ये मी मुंबईला आले.” पुढे ती म्हणाली की, “बॉलिवूडमध्ये हळूहळू काम मिळायला सुरू झाली. असिस्टंट कॅमेरापर्सन म्हणून मी 6 वर्षे कामही केले. पण मग कोरोना आला आणि सर्व काही बदलले.”

आता सुचिस्मिता तिच्या आईसोबत कटकमध्ये राहत आहे. तिच्या वडिलांचे निधन झाले असून, आता घरात ती एकुलती एक कमाई करणारी आहे. अशा परिस्थितीत, तिच्याकडे मोमोज विकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.

सुचिस्मिताने तिच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितले की, एकेकाळी तिला तिचे लहान-मोठे खर्च उचलता येत नव्हते. ती म्हणाली की, “माझ्या घरी जाण्यासाठी देखील माझ्याकडे पैसे नव्हते. अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी मला आणि आमच्या टीमला मदत केली. त्याच वेळी, लॉकडाऊन दरम्यान प्रकृती अधिकच खराब झाली होती. सर्व बचतही संपत चालली होती आणि काम मिळण्याची दिशा दिसत नव्हती. बॉलिवूडमध्ये परत येण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, मला यश मिळाले नाही.”

या परिस्थितीने, आता चांगल्या महिला कॅमेरापर्सनला रस्त्याच्या कडेला मोमोज विकायला भाग पाडले. कमाई तर चालू आहे, परंतु ती तिचे वास्तविक स्वप्न विसरत चालली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लग्नानंतर बोल्ड आणि किसींग सीन करण्याबाबत अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली ‘मला असे सीन…’

-दिपीका-रणवीरच्या रोमान्सच्या व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा, सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडीओ

-रश्मिका आणि कार्ती यांच्या बहूचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत

-भोजपुरी स्टार राकेश मिश्राने केला अक्षरा सिंगसोबतचा ‘थ्रोबॅक’ फोटो शेअर, सोशल मीडियावर होतोय जोरदार व्हायरल

हे देखील वाचा