Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड हिना खानच्या हॉट अंदाजावर चाहत्यांसह सेलिब्रिटीही फिदा! कमेंट्स करत केले अभिनेत्रीचे कौतुक

हिना खानच्या हॉट अंदाजावर चाहत्यांसह सेलिब्रिटीही फिदा! कमेंट्स करत केले अभिनेत्रीचे कौतुक

छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री हिना खान आजकाल सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती वारंवार तिचे नवनवीन फोटो, व्हिडिओ चाहत्यांसह इंस्टाग्रामवर शेअर करत असते. दरम्यान, तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच कलाकारांनीही कमेंट्स केल्या आहेत. तिचा हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

या फोटोत अभिनेत्री हिना खान पोझ देताना मागे पाहत आहे. हिनाचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय. फोटोला आत्तापर्यंत साडेचार लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटीही स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकले नाहीत. ते तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत.

इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करत हिना खानने ‘हे’ (hey) असे कॅप्शन लिहिले आहे.

अभिनेत्री गौहर खानने यावर कमेंट करत लिहिले की, ‘सुंदर’. याशिवाय, अभिनेत्री आरती अग्रवालने कमेंट करत ‘कूल शॉट’ लिहिले आहे, तर टीना दत्ताने लिहिले की, ‘स्टनिंग पिक.’

याआधीही तिने मालदीवमध्ये सुट्टी घालवतानाचे तिचे काही फोटो शेअर केले होते, जे सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये ती ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये डार्क सन ग्लासेस घालून दिसली. काही माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्री हिना खान सध्या तिचा प्रियकर रॉकी जयस्वालसोबत मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे आणि यादरम्यान तिने हे फोटोशूट केले आहे.

हिना खानने आपल्या टीव्ही कारकिर्दीची सुरूवात एकता कपूरच्या प्रसिद्ध टीव्ही शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ पासून केली होती. त्यात तिने अक्षरा माहेश्वरीची भूमिका साकारली होती, जी प्रचंड गाजली. यानंतर तिने बर्‍याच टीव्ही कार्यक्रमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. तिने विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘हॅक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ करण्यात आला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलियानंतर राम चरणचा ‘या’ चित्रपटातील लूक व्हायरल, मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

-‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री पडली होती टीव्हीवर भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात, १६ व्या वर्षी निभावले होते सूनेचे पात्र

-चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित

हे देखील वाचा