Monday, February 16, 2026
Home बॉलीवूड धुरंधर 2 टीझर रिलीज: ‘हमजा’चा कहर, रणवीर सिंहचा रौद्र अवतार; नेटकरी म्हणाले – ‘हा टीझर नाही, बॉम्ब आहे

धुरंधर 2 टीझर रिलीज: ‘हमजा’चा कहर, रणवीर सिंहचा रौद्र अवतार; नेटकरी म्हणाले – ‘हा टीझर नाही, बॉम्ब आहे

रणवीर सिंहच्या ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’च्या जबरदस्त यशानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची आतुरता होती. आता ती प्रतीक्षा संपली असून ‘धुरंधर 2’चा टीझर अधिकृतपणे रिलीज झाला आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्यासह रणवीर सिंह, आर. माधवन, सारा अर्जुन आदी कलाकारांनी सोशल मीडियावर टीझरची झलक शेअर केली होती आणि अखेर चाहत्यांसाठी हा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे.

धुरंधर 2’चा (Dhurandhar 2)टीझर हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही रिलीज करण्यात आला आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. टीझरची सुरुवातच थरारक असून रणवीर सिंहचा भयानक आणि रौद्र लुक पाहायला मिळतो.

सुमारे 1 मिनिट 12 सेकंदांचा हा टीझर अ‍ॅक्शन, मारधाड आणि गोळीबाराने भरलेला आहे. संपूर्ण टीझरमध्ये फारसे संवाद नाहीत, मात्र शेवटी रणवीर सिंहचा दमदार डायलॉग ऐकायला मिळतो—
“ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी.” या एका ओळीनेच टीझरचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो.

टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका युजरने लिहिले, “ये टीझर नाही, बॉम्ब आहे… सगळ्यांचा सफाया!” दुसऱ्याने म्हटले, “हा सिनेमा नाही, पूर्ण मूव्हमेंट आहे… 2000 कोटी लोडिंग!”
अशा असंख्य कमेंट्समधून प्रेक्षकांचा उत्साह दिसून येतो.

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ हे दोन्ही चित्रपट उरी फेम दिग्दर्शक आदित्य धर यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केले आहेत. ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांनी जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओजच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर 2’चा सामना यशची ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ आणि आदिवी शेष–मृणाल ठाकुर यांचा ‘डकैत’ या चित्रपटांशी होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

धुरंधर 2चा पहिला पोस्टर रिलीज, रणवीर सिंहचा वॉयलेंट लुक, 12.12 वाजता होणार मोठा धमाका

हे देखील वाचा