छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय शाे ‘बिग बॉस 13‘ मधून प्रसिद्ध झालेली शहनाज गिल हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती पंजाबी गाणे गाताना दिसत आहे. शहनाजच्या आवजानं तिचा चाहतावर्ग प्रचंड भावूक झाला आहे. व्हिडिओ पाहून त्यांना सिद्धार्थ शुक्ला याची आठवण आली. शहनाजचा हा व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत असून चाहते तिच्या या व्हिडिओर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
शेहनाजच्या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव
व्हिडिओमध्ये शेहनाज (shehnaaz gill) हिने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे आणि तिचे केस खुले साेडले आहेत साेबतची ती माइकसमाेर उभी राहून गाणे गाताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत शहनाजने 5 स्टार इमोजी देखील टाकला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत असून तिच्या व्हिडिओला 24 तासांत अडीच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर 11 हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत.
View this post on Instagram
शहनाज शेअर करणार सलमान खानसाेबत स्क्रिन
शहनाज गिल बिग बॉस 13 मधून प्रसिद्ध झाली. हा शो सिद्धार्थ शुक्लाने जिंकला होता. या शाेमध्ये दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. मात्र, सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज पुर्णपणे तुटली. आता ती लवकरच सलमान खानसोबत ‘कभी ईद, कभी दिवाली’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच तिने या चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहेत.
View this post on Instagram
शहनाज गिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा साेशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या चाहत्यांशी बोलत असते. याआधी शहनाज अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली. मात्र, तिला सिद्धार्थ शुक्लासोबत फक्त अर्धा म्युझिक व्हिडिओ शूट करता आला आणि त्यानंतर सिद्धार्थचा मृत्यू झाला.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेच्या हातावर रंगली मेहंदी, सोशल मीडियावर फोटो होतेय तुफान व्हायरल
रवीना टंडन हिच्या मोहक अदा, पाहा फोटो