काश्मीर फाईल्स फेम अनुपम खेर यांनी अलीकडेच बॉलिवूड मेगास्टार्स अमिताभ बच्चन, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंगपा, परिणीती चोप्रा आणि नीना गुप्ता यांचा समावेश असलेल्या ‘ऊंचाई’ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) नुकतीच ‘ऊंचाई‘ (Uunchai) या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सलमान खान, अक्षय कुमार, काजोल, माधुरी दीक्षित, जया बच्चन आणि रानी मुखर्जी हे कलाकार उपस्थित होते. यावेळी शहनाजनं हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली.
शहनाज गिल चित्रपट पाहण्यासाठी आली होती
या चित्रपटाला स्टार्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्री शहनाज गिलही पोहोचली. यादरम्यान शहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर शहनाज गिल खूपच भावूक दिसली.
View this post on Instagram
ऊंचाई पाहून इमोशनल झाली शहनाज
स्क्रिनिंग झाल्यानंतर शहनाजनं पॅपराजीसोबत संवाद साधला. यावेळी ऊंचाई चित्रपटाबद्दल शहनाज म्हणाली, ‘मी हा चित्रपट पाहिल्यानंतर खूप इमोशनल झाले. मी चित्रपट पाहून रडले. हा चित्रपट प्रत्येकानं बघावा. आयुष्यात अशक्य गोष्ट देखील शक्य होऊ शकते, असा संदेश या चित्रपटागद्वारे देण्यात आला आहे.’
देसी वाइब्स विथ शहनाज गिल
अभिनेत्री तिचा नवीन शो ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ घेऊन येत आहे, ज्यामध्ये ती अनेक स्टार्ससोबत गॉसिप करताना दिसणार आहे. शहनाज तिच्या बबली स्टाईलसाठी ओळखली जाते, त्यामुळे हा शो खूप धमाल करेल अशी अपेक्षा आहे.
शहनाजचा आगामी चित्रपट
लवकरच शहनाजचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सलमान खान प्रमुख भूमिका साकारणार आहे तर काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील सलमानचा लूक रिव्हील करण्यात आला.(shehnaaz gill crying after watching uunchai watch viral video)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘द काश्मीर फाइल्स’ नंतर विवेक अग्निहोत्रीने केली नव्या चित्रपटाची घोषणा; तब्बल 11 भाषांमध्ये होणार रिलीझ
रश्मीचा देसी लूक चर्चेत, जिंकली चाहत्यांची मने!