Saturday, March 2, 2024

‘द काश्मीर फाइल्स’ नंतर विवेक अग्निहोत्रीने केली नव्या चित्रपटाची घोषणा; तब्बल 11 भाषांमध्ये होणार रिलीझ

द कश्मीर फाइल्स‘ (The Kashmir Files) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता द कश्मीर फाइल्स चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्रीने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. द व्हॅक्सिन वॉर असं त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. काश्मीर फाईल्समध्ये विवेकने काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत भाष्य केलं होत. त्यानंतर आता विवेक आपल्या आगामी चित्रपटात नवीन काय घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ट्वीट शेअर करुन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची माहिती दिली.

हा चित्रपट भारतीय जैवशास्त्रज्ञ आणि स्वदेशी लसी या विषयांवर आधारित असून, या महिन्यापासून चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाचा अभिमान वाटावा यासाठी ही कथा सांगावी असं अग्निहोत्री यांनी चित्रपटाच्या नावाची घोषणा करताना म्हंटले आहे. पल्लवी जोशी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. निर्मात्यांनी अद्याप कलाकारांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे लसीचे संशोधन करणाऱ्या मुख्य पात्रासाठी कोणता चेहरा झळकेल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटाचं पोस्टर दिसत आहे. या पोस्टरला विवेक यांनी कॅप्शन दिलं, ‘सादर करत आहोत- ‘द वॅक्सीन वॉर’. भारताने लढलेल्या युद्धाची एक अविश्वसनीय सत्य कथा. हा चित्रपट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. हा चित्रपट 11 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या.’

अनेक नेटकऱ्यांनी द वॉक्सीन वॉर या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हा एक सुपर डुपर हिट चित्रपट असेल. मी माझ्या मित्रांसोबत फर्स्ट डे फर्स्ट शो बघेन.’ अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली.

हा चित्रपट 15 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी जागतिक प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा 11 हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.(the kashmir files director vivek agnihotri announced movie title the vaccine war)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रश्मीचा देसी लूक चर्चेत, जिंकली चाहत्यांची मने!

अभिनयात नाहीतर ‘या’ क्षेत्रामध्ये सिंपल कपाड़ियाने केले होते करिअर, वाढत्या प्रसिद्धीमध्येच ठोकला जगाला राम राम

हे देखील वाचा