Tuesday, January 20, 2026
Home कॅलेंडर द डर्टी पिक्चरमधील ‘त्या’ अभिनेत्रीच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा! पोटात आढळली दोन लीटर दारू

द डर्टी पिक्चरमधील ‘त्या’ अभिनेत्रीच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा! पोटात आढळली दोन लीटर दारू

कोलकातामध्ये ‘द डर्टी पिक्चर’ फेम आर्या बॅनर्जीचा नुकताच संशयादस्पद मृत्यू झाला. आर्या तिच्या घरात पोलिसांना मृत अवस्थेत सापडली होती. आर्याच्या मृत्यू प्रकरणी पोस्टमार्टम रिपोर्ट आले असून पोलिसांनी तिच्या मृत्यू बाबत खुलासा केला आहे.

कोलकाता पोलिसांनी आर्या बँनर्जीच्या मृत्यूप्रकरणी पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये असलेला अहवाल सांगत, आर्याचा मृत्यू हा अति मद्यसेवनाने झाला असल्याचा खुलासा केला आहे. आर्याने अतिमद्यसेवन केले आणि त्यात तिला हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे ती मदत मागण्यासाठी उठत असतांना तिचा तोल जाऊन ती पडली त्यात तिला जखम झाली आणि त्यातून रक्तस्राव झाला, असे पोलिसांनी सांगितले.

आर्याच्या पोटात सुमारे दोन लिटर दारू होती. तिच्या घरातून अनेक दारूच्या बाटल्या आणि रक्ताने भरलेले कागद सापडले आहेत. तत्पूर्वी आर्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी ही शक्यता फेटाळली आहे.

आर्याचा काही दिवसांपूर्वी तिच्या कोलकाता मधील जोधपूर पार्क परिसरात असणाऱ्या घरात संशयास्पद मृत्यू झाला होता. घरातील कामासाठी आर्याची मोलकरीण तिच्या घरी आली असतांना, आर्याने घराचा दरवाजा उघडला नाही की फोन उचलला नाही. नोकरणीला संशय आला असल्याने तिने पोलिसांना फोन करून बोलवले पोलिसांनी आल्यावर दरवाजा तोडला तेव्हा आर्या तिच्या रूममध्ये बेडवर रक्ताच्या थारोळ्यात मृत झालेली दिसली.

आर्याने बॉलीवूडमध्ये ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव्ह सेक्स और धोखा’ सारख्या हिंदी चित्रपटांत काम केले होते. आर्या ही प्रसिद्ध सतारवादक निखिल बॅनर्जी यांची मुलगी होती.

आर्याकडे जास्त लोकांचे येणे जाणे नसल्याने आर्याने आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शी संशय पोलिसाना आला होता. आर्याच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आता अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. आर्याच्या अचानक जाण्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.

 

हे देखील वाचा