मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ट अभिनेते विक्रम गाेखले यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. विक्रम गाेखले यांना पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर या रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विक्रम गाेखले रुग्णालयात अत्यंत गंभीर स्थितीत असल्याचं समजले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाच्याही अफवा पसरल्या होत्या मात्र, सध्या त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे समोर आले आहे.
अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी पुण्यात झाला. विक्रम यांचे कुटुंब हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. त्यांनीदेखिल आपल्या दमदार अभिनयने इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. मराठीच नाही तर हिंदी चित्रपटातही त्यांच्या कारकीर्दीने छाप सोडली आहे.
काही दिवसांपासून त्यांची तब्येत अचानकच बिघडली होती, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना वेंटीलेटरवर ठेवले होते. टीव्ही आणि सोशल मीडियावर त्यांचा मृत्यू झाला अशा अफवा पसरल्या होत्या, पण ही बातमी खोटी आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी स्वत: पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘विक्रम गोखले गेले नाहीत ते अजून जिवंत असून वेंटीलेवर आहेत. अशी माहिती दिली.’
#VikramGokhale pic.twitter.com/DB15eJmI7x
— Prof. M. Bhrahmadeo (@profBramha) November 25, 2022
माध्यामातील वृत्तानुसार विक्रम गोखले यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती जनसंपर्क शिरिश याडगीकर यांनी दिली. नुकतंच गोखले यांचा मेडिकल रिपोर्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांची तब्येत सुधरल्याचे सांगितले असून त्यांनी डोळेही उघडले आहेत आणि हातपायांची हालचालही केली आहे. त्याशिवय त्यांचा बीपी देखिल नॉर्मल झाला आहे. 48 तासानंतर वेंटीलेटरही काढण्याची शकत्या सांगितली आहे. अशी माहिती डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये सांगितली आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास घेतला असून चाहत्यांनाही ही बातमी ऐकूण आनंद झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लोक आपल्या विषयी काय विचार करतात’, प्रदिप खरेराने पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना
राखी सावंतने सांगितला होळीचा किस्सा, जेव्हा तिने फुगे समजून कंडोममध्ये भरले होते पाणी तेव्हा…










