ब्रेकिंग! प्रसिद्ध मराठी अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत प्रचंड खालावली, रुग्णालयात उपचार सुरु

0
93
vikram - gokhale

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ट अभिनेते विक्रम गाेखले यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. सध्या विक्रम गाेखले यांना पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर या रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विक्रम गाेखले रुग्णालयात अत्यंत गंभीर स्थितीत असल्याचं कळत आहे.  विक्रम गाेखले यांनी टीव्ही मालिका, बाॅलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या.

अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी पुण्यात झाला. विक्रम यांचे कुटुंब हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळापासून सक्रिय आहे. त्यांची आजी हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या भारतीय कलाकार हाेत्या. तर त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे मराठीतील ज्येष्ठ अभिनेते आणि रंगमंच कलाकार हाेते. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी जवळपास 70 हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनयाबरोबरच अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केले काम
गोखले हे समाजसेवकही आहेत. त्यांच्या कुटुंबाने 23 वर्षांपूर्वी एक संस्था स्थापन केली होती, ज्या अंतर्गत अपंग सैनिक गरीब मुलांना शिक्षण आणि त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवल्या जातात. सामाजिक कार्यासाेबतच ते राजकीय विषयावरही सातत्यानं भाष्य करत असतात.

मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखलेंचं मोलाचं योगदान
अभिनेते विक्रम गाेखले यांच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले तर, ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गाेदावरी’ या चित्रपटात दिसले हाेते. या चित्रपटात त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात छाप साेडली. या चित्रपटातील विक्रम गाेखले यांच्या अभिनयानं सर्वत्र काैतुक झाले. त्याचप्रमाणे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेद्वारे विक्रम गाेखले अनेक वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र, घशाच्या त्रासामुळे अभिनेत्यांनी नाटकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. (Famous Marathi actor Vikram Gokhale health has seriously deteriorated, he is undergoing treatment in the hospital)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आपल्या डान्सने सगळ्यांना भुरळ घातलेल्या अमृता खानविलकरचा असा आहे सिनेसृष्टीतील प्रवास, वाचा

दिशा सालियनच्या मृत्यूबाबत मोठी बातमी, सीबीआयने सांगितले दिशाच्या मृत्यूचे कारण, वाचा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here