हिंदी भाषेतील साहित्याचा आधारस्तंभ म्हटल्या जाणार्या हरिवंशराय बच्चन यांची रविवारी (27 नाेव्हेंबर)ला जयंती आहे. हरिवंशराय बच्चन यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 रोजी प्रयागराज येथे झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे हरिवंशराय बच्चन यांच्यासाेबत नाते कसे होते? हे त्याच्या चाहत्यांना चांगलेच माहीत आहे. वडिलांची आठवण करून अमिताभ अनेकदा भावूक होताना दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का की, एकदा अमिताभ बच्चन यांनी वडिलांना विचारले हाेते की, ‘त्यांनी त्यांना जन्म का दिला’?
खरे तर, अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी एकदा वडिल हरिवंशराय (harivansh rai bachchan) यांना विचारले होते की, ‘त्यांनी त्यांना जन्म का दिला?’ या प्रश्नाचे उत्तर हरिवंशराय यांनाी अतिशय मनोरंजक पद्धतीने दिले. या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी एक कविता लिहिली हाेती, ज्यामध्ये त्यांनी हा प्रश्न आगामी काळातही तसाच राहणार असल्याचे म्हटले होते. असं काय लिहिलयं त्या कवितेत चला जाणून घेऊया…
जिंदगी और जमाने की कशमकश से घबराकर मेरे बेटे मुझसे पूछते हैं कि हमें पैदा क्यों किया था?
और मेरे पास इसके सिवाय कोई जवाब नहीं है कि मेरे बाप ने मुझसे बिना पूछे मुझे क्यों पैदा किया था?
और मेरे बाप को उनके बाप ने बिना पूछे उन्हें और उनके बाबा को बिना पूछे उनके बाप ने उन्हें?
जिंदगी और जमाने की कशमकश पहले भी थी,
आज भी है शायद ज्यादा…कल भी होगी, शायद और ज्यादा…तुम ही नई लीक रखना,
अपने बेटों से पूछकर उन्हें पैदा करना।”
हरिवंशराय बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा आणखी एक किस्सा खूप लोकप्रिय आहे, ज्यामध्ये काळाचे चक्र दाखवले आहे. हरिवंशराय बच्चन हे प्रसिद्ध कवी आहेत. पण एकेकाळी ते कवी संमेलनांना पैसे मिळवण्यासाठी जात असत. जिथे त्यांना 500 ते 1000 रुपये मिळत असत. हे काम उरकून घरी परतायला पहाटे 3 ते 4 वाजायचे. मग अमिताभ बच्चन नेहमी वडिलांना विचारायचे की, ‘ते घरी उशिरा का येतात’?
त्याचवेळी अमिताभ बच्चन यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा तेही दोन-तीन शिफ्टमध्ये काम करायचे. अनेकवेळा ते सकाळी सहा वाजता घरी पाेहचायचे. यावेळी हरिवंशराय बच्चन आपल्या मुलाला म्हणायचे की, ‘बेटा, हा वेळ आहे घरी यायचा?’ त्यावेळी बिग बी देखील वडिलांच्या उत्तराची पुनरावृत्ती करायचे की, ‘बाबा मोठ्या कष्टाने पैसे मिळतात.’
अमिताभ बच्चन यांच्या काराकिर्दी विषयी बाेलायचे झाल तर, ‘त्यांनी वक्त’, ‘पहेली’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘हम’, ‘गंगा जमुना सरस्वती’ यासारखी दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिली. (harivansh rai bachchan birth anniversary when bollywood actor amitabh bachchan asked to father why did you give birth to me)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
महाभारत फेम अभिनेता पुनीत इस्सर यांचे ईमेल आयडी हॅक, तब्बल 13 लाखांना लागला असता चुना