Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड ‘वाघ कधी आणि कशी प्रतिक्रिया देईल…’, जंगल सफारी प्रकरणावर अभिनेत्रीचे स्पष्टीकरण

‘वाघ कधी आणि कशी प्रतिक्रिया देईल…’, जंगल सफारी प्रकरणावर अभिनेत्रीचे स्पष्टीकरण

जंगल सफारीचा मोह कुणाला आवडत नाही? अर्थातच सर्वांनाच आवडतो. प्राण्यांना पाहण्यासाठी सामान्य व्यक्तींपासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत प्रत्येकजण जंगल सफारीसाठी जात असतो. मात्र, तिथे गेल्यानंतर ते असे काही करून बसतात, ज्यामुळे वाद निर्माण होतो. आताही असेच काहीसे झाले आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने मागील काही दिवसांपूर्वी सातपुडा व्याघ्र प्रकल्पाला भेट देत जंगल सफारीचा आनंद लुटला. यादरम्यानचा तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती एका वाघाच्या खूपच जवळ जाऊन व्हिडिओ शूट करताना दिसत आहे, ज्यात वाघही प्रतिक्रिया देताना दिसत आहे. मात्र, आता या व्हिडिओने रवीनाच्या अडचणीत आणले आहे.

खासगी दौऱ्यावर व्याघ्र प्रकल्प पाहायला गेलेली रवीना
रवीना टंडन (Raveena Tandon) ही 22 नोव्हेंबर रोजी व्याघ्र प्रकल्पाच्या खासगी दौऱ्यावर गेली होती. येथून तिने अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने हेदेखील सांगितले होते की, यादरम्यान तिच्यासोबत विभागाचे प्रशिक्षित गाईड आणि ड्रायव्हर होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची दखल घेत विभागाने एटीआर व्यवस्थापनाला चौकशीचे आदेश दिले आहेत.

अभिनेत्रीचे स्पष्टीकरण
अशात अभिनेत्रीने या प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, ट्विटरवर एका माध्यम संस्थेच्या रिपोर्टचा व्हिडिओ रिट्विट करत लिहिले की, “एक वाघ त्याच्या डेप्युटी रेंजरच्या दुचाकीजवळ येतो. वाघ कधी आणि कशी प्रतिक्रिया देईल हे कोणीही सांगू शकत नाही. ही वनखात्याची परवाना असलेली वाहने आहेत आणि त्यांचे मार्गदर्शक, चालक यांना त्यांच्या मर्यादा आणि कायदे काय आहेत हे माहिती आहे.”

दुसरीकडे, अभिनेत्रीने आणखी एका ट्वीटमध्ये लिहिले की, ती आणि तिच्यासोबत प्रवास करणारे इतर सहकारी शांततेत वाघिणीला पुढे जाताना पाहत होते. आम्ही पर्यटनाच्या रस्त्यावर होतो, जो अधिकतर वाघ पार करतात. तसेच, या व्हिडिओत वाघीण केटीलाही वाहणांच्या जवळ येण्याची आणि डरकाळी फोडण्याची सवय असते.

अधिकाऱ्यांची होणार चौकशी
माध्यमांतील वृत्तांनुसार, या प्रकरणाची माहिती देत एसडीओ धीरज सिंग चौहान मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) म्हणाले की, “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर त्यांनी अभिनेत्रीच्या कथित घटनेची चौकशी सुरू केली आहे. अभिनेत्री जंगल सफारीदरम्यान तिची गाडी कथितरीत्या वाघिणीजवळ गेली होती. तिथे ड्युटीवर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस दिली जाईल आणि त्यांची तपासणीही होईल.”

या प्रकरणात पुढे काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Actress Raveena Tandon give her clarification in tiger reserve case know here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
दु:खद! लग्नाच्या काही तासानंतर प्रसिद्ध गायकाचे निधन; हंबरडा फोडत पत्नी म्हणाली, ‘इतक्या वेदना…’
चाहत्यांना पुन्हा अनुभवता येणार विक्रम गोखलेंचा दमदार अभिनय, निधनानंतर झळकणार ‘या’ सिनेमात

हे देखील वाचा