Thursday, March 28, 2024

सफारी व्हिडिओमुळे रवीना टंडन अडचणीत, नियम तोडल्याप्रकरणी अभिनेत्रीची होणार चौकशी

रवीना टंडन बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्कृष्ट वाइल्ड लाइफ फोटोग्राफर देखील आहे. दरवर्षी ती तिच्या कुटुंबासह देशातील विविध जंगलांमध्ये आणि अभयारण्यांमध्ये जाते आणि फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांना तिची सुंदर झलक दाखवते. नुकतीच तिने मध्य प्रदेशातील नर्मदापुरम येथील सातपुडा व्याघ्र प्रकल्पात जाऊन जंगल सफारीचा आनंद लुटला. यादरम्यान तिने टायगरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शूट केले, ज्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. हा वाद वाघाच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढणे आणि व्हिडिओ बनवण्याशी संबंधित आहे.

सातपुडा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने रवीना टंडन (raveena tandon) हिच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. टायगरच्या व्हिडिओ शूटमध्ये नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. रवीनाने 25 नोव्हेंबरला जंगल सफारीचा व्हिडिओ ट्विट केला होता. व्हिडीओमध्ये जिप्सी वाघाच्या अगदी जवळ आली होती आणि वाघ पुढे ओरडत होता. यामुळे तिचा जीवही धोक्यात येऊ शकत हाेता.

सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या नियमानुसार सफारीदरम्यान वन्य प्राण्यांपासून जिप्सीचे अंतर किमान 20 मीटर असायला हवे, पण रवीना टंडनने हे नियम पाळले नाहीत. सातपुडा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. रवीना दोषी आढळल्यास तिच्यावरही योग्य ती कारवाई हाेईल.

 

सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचे बोरीचे एसडीओ धीरज सिंग चौहान चौकशी करून अहवाल एसडीओ क्षेत्र संचालकांना सोपवतील. यामध्ये खालील प्रश्नाच्या उत्तराचा समावेश राहिल.

  • त्या जिप्सीवर कोणते विभागीय कर्मचारी होते?
  • जिप्सी वाघाच्या इतक्या जवळ कशी आली?
  • मार्गदर्शकाने नियमांकडे दुर्लक्ष कसे केले?

कारण, सफारीदरम्यान काही घटना घडल्यास त्याची जबाबदारी स्वत:ची असते. वाघ आणि इतर प्राण्यांपासून पर्यटकांच्या जिप्सीमध्ये सुमारे 20 मीटरचे अंतर असावे. काही दिवसांपूर्वी रवीना टंडनने भोपाळच्या वन विहारमध्ये वाघाला केलेल्या दगडफेकीवर स्पष्टीकरण देताना दिसली होती आणि वन विहारच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. (bollywood actress raveena tandon break rule satpura tiger reserve as management order to investigate)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“वैयक्तिक मतांना मान्यता…”, लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’बाबत केलेल्या वक्तव्यावर IFFI च्या ज्युरींची स्पष्ट भूमिका

लग्नाबद्दल होणाऱ्या ट्रोलिंगवर मराठमोळ्या नेहा पेंडसेची प्रतिक्रिया, म्हणाली ‘माझ्या पतीला त्रास…’

हे देखील वाचा