कलाविश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है‘ फेम अभिनेता मोहसिन खान याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. ते व्यक्ती इतर कुणी नसून मोहसिनचे आजोबा आहेत. त्याचे आजोबांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याने ही दु:खद बातमी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.
मोहसिन खानच्या आजोबांचे निधन
अभिनेता मोहसिन खान (Mohsin Khan) याने 2 डिसेंबर, 2022 रोजी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट स्टोरीवरून ही बातमी दिली. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर त्याच्या आजोबांसोबतचे अनेक फोटो कोलाज करून शेअर केले आहेत. या फोटोंवरून असे दिसते की, तो त्याच्या आजोबांच्या किती जवळ होता. कोलाज शेअर करत त्याने एक दुआ लिहिली आहे, ज्यावरून समजते की, त्याच्या आजोबांचे निधन झाले आहे.
अभिनेत्याने स्टोरी शेअर करत लिहिले आहे की, “इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैही राजिऊन.” याचा अर्थ असा होतो की, वास्तवात आपण परमेश्वराचे आहोत आणि वास्तवात आपण त्याच्याकडेच परतणार आहोत.

‘या’ मालिकेतून मिळाली प्रसिद्धी
मोहसिन खान याच्याबद्दल बोलायचं झालं, तर तो टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्याने कार्तिकची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला. त्याच्या हँडसम व्यक्तिमत्त्वापासून ते त्याच्या अभिनयापर्यंत चाहत्यांना त्याची प्रत्येक गोष्ट आवडते.
View this post on Instagram
या मालिकेतही दाखवलाय अभिनयाचा जलवा
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेने मोहसिनला प्रसिद्धी मिळवून दिली असली, तरीही त्याने त्यापूर्वी ‘निशा और उसके कजिन्स’ या मालिकेतही काम केले आहे. त्यासोबतच त्याने ‘ड्रीम गर्ल’, ‘प्यार तुने क्या किया’, ‘मेरी आशिकी तुम से ही’, ‘लव्ह बाय चान्स’ यांसारख्या मालिकेतून तो घराघरात पोहोचला आहे. याव्यतिरिक्त त्याने अनेक अभिनेत्रींसोबत म्युझिक व्हिडिओतही काम केले आहे. त्यामध्ये ‘बारिश’, ‘वो चांद कहां से लाओगी’, ‘प्यार करते हो न’ यांसारख्या म्युझिक व्हिडिओंचा समावेश आहे. (yeh rishta kya kehlata hai fame actor mohsin khan grandfather passed away actor shared emotional post)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
प्रसिद्ध गायिकेकडे निर्मात्याने केलेली मागणी; म्हणाला होता, ‘माझ्यासोबत अंघोळ कर नाहीतर, 40 हजार…’
‘मला तर वाटतं ही…’, पाकिस्तानी अभिनेत्रीने ‘तसले’ फोटो शेअर करताच भडकले युजर्स