Thursday, April 25, 2024

‘मला तर वाटतं ही…’, पाकिस्तानी अभिनेत्रीने ‘तसले’ फोटो शेअर करताच भडकले युजर्स

सोशल मीडियाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यावर लहान मुलांपासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत सर्वजण आपले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहेत. कलाकार सोशल मीडियावर जे काही पोस्ट करतात, त्यामुळे अनेकदा वादंग निर्माण होतो. असेच काहीसे आता पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा उमर हिच्यासोबत झाले आहे. तिने तिचे बिकिनीमधील फोटो शेअर केल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

बिकिनीतील फोटोंमुळे अभिनेत्री ट्रोल
पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा उमर (Pakistani Actress Ayesha Omar) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती समुद्रकिनारी पोझ देताना दिसत आहे. तसेच, ती नयनरम्य दृश्यांचा आनंद लुटत आहे.

आयेशाची इंस्टाग्राम पोस्ट
आयेशा उमर (Ayesha Omar) हिने तिचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ऍलन वॉट्स यांचा कोटचा समावेश केला आहे. तिने लिहिले की, “आयुष्याचा अर्थ म्हणजे फक्त जिवंत राहणे आहे. हे इतके साधे, स्पष्ट आणि सरळ आहे. तरीही प्रत्येकजण भीतीमुळे इकडून तिकडे धावतात. जसे की, स्वत:पेक्षा इतर काही मिळवणे गरजेचे आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Omar (@ayesha.m.omar)

मात्र, आयेशाचा हा अंदाज नेटकऱ्यांना आवडला नाही. अनेकांनी कमेंट्स करत तिच्या लूकवर नाराजी व्यक्त केली आहे. आयेशाच्या बिकिनी लूकवर पाकिस्तानी सोशल मीडिया युजर्स भडकले आहेत, तर काहींनी तिला पाठिंबा दिला आहे. एकाने लिहिले आहे की, “मला कधीकधी वाटते की, ही मुस्लिम नाहीये.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “तू खूप सुंदर दिसत आहेस.”

खरं तर, आयेशा पाकिस्तानी कलाविश्वातील मोठे नाव आहे. मागील काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झा आणि तिचा पती तसेच, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या होत्या. कारण, शोएब मलिक आणि आयेशाच्या अफेरच्या बातम्या जोरदार व्हायरल झाल्या होत्या. तेव्हापासून तिचे नाव शोएब मलिकसोबत जोडले जात आहे.

आयेशाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘जिंदगी गुलजार है’ या मालिकेचा भाग राहिली आहे. सध्या ती फिरोज खान अभिनित ‘हब्स’मध्ये दिसत आहे. (pakistani actress ayesha omer troll for posing in bikini read here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
बाबो! 5 वर्षांचा असताना हरवला होता तुषार कपूर; म्हणाला, ‘ते नसते तर आज मी इथं नसतो’
फोटोत दिसणाऱ्या ‘या’ मुलांना ओळखलं का? त्यांनी मोठेपणी गाजवलंय बॉलिवूड, मुली अन् सुनबाईही आहेत स्टार

हे देखील वाचा