Home टेलिव्हिजन लग्नाच्या 18 वर्षानंतर हे कलाकार जाेडी पहिल्यांदाच झाले आई-बाबा, शेअर केला मुलीचा व्हिडिओ

लग्नाच्या 18 वर्षानंतर हे कलाकार जाेडी पहिल्यांदाच झाले आई-बाबा, शेअर केला मुलीचा व्हिडिओ

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री महिमा चौधरी यांच्या ‘परदेस‘ या चित्रपटात राजीवची भूमिका साकारून सर्वत्र प्रसिद्ध झालेला अपूर्वा अग्निहोत्री वडील झाला आहे. अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. अपूर्व अग्निहोत्री आणि अभिनेत्री शिल्पा सकलानी लग्नाच्या 18 वर्षानंतर आई-वडील झाले आहेत. दोघेही ग्लॅमर जगतातील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. अपूर्व आणि शिल्पासाठी हा काळ खूप खास आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक गोंडस व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली.

अभिनेता अपूर्व (apurva agnihotri ) याने व्हिडीओमध्ये आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला असून कॅप्शनसह त्याचा आणि शिल्पाचा आनंद व्यक्त केला आहे. व्हिडिओ शेअर करताना अपूर्वने लिहिले, “आणि अशा प्रकारे हा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खास वाढदिवस ठरला. कारण, देवाने आम्हाला सर्वात विशेष, अविश्वसनीय, आश्चर्यकारक, चमत्कारिक भेट दिली आहे. अत्यंत कृतज्ञता आणि अपार आनंदाने, शिल्पा आणि मी आमची लाडकी लेक ईशानी कानू अग्निहाेत्री हिची ओळख करून देऊ इच्छितो. तिच्यावर तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करा. ओम नमः शिवाय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Apurva Agnihotri (@apurvaagnihotri02)

व्हिडिओमध्ये शिल्पा आपली मुलगी इशानीला कळेवर घेऊन दिसत आहे, तर अपूर्व त्याच्या मुलीकडे प्रेमाने पाहत आहे. व्हाइट आणि पिंक कलरच्या ड्रेसमध्ये इशानी खूपच क्यूट दिसत आहे, तर अपूर्व आणि शिल्पा फक्त कॅज्युअल लूकमध्ये आहेत. अपूर्व अग्निहोत्रीने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनेक सेलिब्रिटींनीही नवीन पालकांचे अभिनंदन केले आहे. अपूर्वच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अपूर्व शेवटचा टीव्ही जगतातील नंबर वन शो ‘अनुपमा’ मध्ये दिसला होता, परंतु काही वेळाने त्याने शोला अलविदा केले. (tv actress apurva agnihotri and shilpa saklani embrace parenthood after 18 years of marriage)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
फटाके वाजवा रे! केएल राहुल अथियासाेबत जानेवारी महिन्यात्यात अडकणार लग्न बंधनात?

प्रसिद्ध गायिकेकडे निर्मात्याने केलेली मागणी; म्हणाला होता, ‘माझ्यासोबत अंघोळ कर नाहीतर, 40 हजार…’

हे देखील वाचा