Tuesday, May 28, 2024

कस्टम ड्युटी अधिकाऱ्यांच्या वक्तव्यानंतर शाहरुख खानने घेतला सुटकेचा श्वास…

अभिनेता शाहरुख खान याला शनिवार (दि, 12 नोव्हेंबर) दिवशी मुंबई विमानतळावरील कस्ट ड्युडी न भरल्यामुळे पोलिसांनी अडवले होते. त्याच्यासोबतच त्याचे कर्मचारी मॅनेजर पुजा ददलानी आणि अंगरक्षक रवी सिंग यांना देखिल पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अभिनेता दुबईहुन एका पुस्तक प्रदर्शनात्या कार्यक्रमासाठी रात्रीच्या 12 वाजता आला होता.

अभिनेता शाहरुख खान  शनिवारी विमानतळारुन येत असताना त्याच्या बॅगमध्ये बाबून आणि झुर्बक घड्याळे, रोलेक्स घड्याळांचे 6 बॉक्स, स्पिरिट ब्रँडची घड्याळे, ऍपल सिरीजची घड्याळे सापडली असल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. शाहरुखकडून कस्टम ड्युटीने 6.83 लाखांचा दंड देखिल भरण्यास सांगितला होता. या प्रकरणामध्ये कस्ट ड्युटी अधिकाऱ्यांनी अजून एक मोठा खुलासा केला आहे.

कस्टम ड्युटी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले केले की, “शाहरुख खान आणि त्याच्या कर्मचाऱ्यांकडून कोणत्याच प्रकारचा दंड वसूल केला नाही. फक्त प्राथमिक औपचारिकता करण्यसा आली. शाहरुखने सोबत आणलेल्या मालावरच ड्युटी लावण्यात आली आहे, त्याव्यतिरिक्त कोणत्याच प्रकारचा दंड वसूल केला नाही.” तेव्हा त्यांना शाहरुखच्या बॉडीगार्डला खाजगी जीए टर्मिनलवरुन टी2 टर्मनलपर्यत का नेले? असा प्रश्न विचारला. अधिकाऱ्यांली उत्तर देत सांगितले की, “जेव्हा एखाद्या प्रवाशाला ड्युटी किंवा अशाप्रकारचा शुल्क भरावा लागतो तेव्हा त्याला जीएम टर्मिनलवरुन नेले जाते, कारण तिथे प्रवाशांसाठी सुविधा आहेत.”

 

View this post on Instagram

 

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, शाहरुख आणि त्याचे कर्मचारी अ‍ॅपल वॉच आणि वॉच वाइंडर बॅग हे त्याला मिळालेल्या भेटवस्तू आहेत आणि तो त्याच घेऊन जात होता. मिळालेल्या भेटवस्तूंची किंमत 17.86 लाख रुपये एवढी होती. त्याच्याकडे कोणत्याही प्ररकारच्या महागड्या वस्तू नव्हत्या हे स्पष्ट करण्यात आले.

शाहरुखच्या या बातमीने सगळीकडे खळबळ ऊडाली होती. अनेकांनी त्याला ट्रोल देखिल केले होते मात्र, अधिकाऱ्यांच्या वक्तव्यानंतर अभिनेत्याने सुटकेचा श्वास घेतला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी : ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा
‘बाई वाड्यावर…’ फेम मानसी नाईक घटस्फोट? सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

हे देखील वाचा