नुकतंच साउथ इंडस्ट्रीमधील एक दु:खद बातमी समोर येत आहे. केजीएफ चॅप्टर: 1 चित्रपटामधील अभिनेता यश यासोबत मुख्य भूमिकेत काम करणारे कन्नड ज्येष्ठ अभिनेता कृष्णा जी राव यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले आहे. ते अनेक दिवसांपासून आजाराशी झुंझ देत होते, शेवटी त्यांना बंगलुरुमधील एका रुग्णालयामध्ये भर्ती केले होते. त्यांच्यावर फुफ्फुसाच्या आजाराचे उपचार सुरु होते शेवटी त्यांनी बुधवार (दि, 07 डिसेंबर) रोजी जागाला राम राम ठोकला.
ज्येष्ठ अभिनेता कृष्णा जी राव (Krishna G Rao) आपल्या नातेवाइकांच्या घरी जात होते, तेव्हा त्यांना घाबरल्यासारखे आणि थकावट जाणवली. त्यांना आराम न मिळाल्यामुळे जवळच्या रुग्णालयात भर्ती करण्यात आले. त्यांच्यावर खूप वेळ आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. तिथेच काही दिवसांपूर्वी त्यांना बंगलुरुच्या सीता सर्कल विनायक रुग्णालयातही भर्ती केले होते. मात्र, पुन्हा तिथेच त्यांचे उपचार सुरु केले शेवटी त्यांनी त्याच रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.
केजीएफमधील एका वृद्ध आंधळ्या व्यक्तीचे मुख्य पात्र कुष्णा जी राव यांनी निभवले होते. तुम्हाला तो सीन नक्कीच आठवत असेल. जिथे माइनचे नोकर त्यांना मारुन टाकण्यासाठी घेऊन जातात. मात्र, तेवढ्यात रॉकी त्या वृद्ध मानसाला वाचवतो आणि माइनमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मनातून त्या सुरक्षा कर्मचारीचे भय देखिल काढून टाकतो. आणि इथूनच कथेला एक नवीन वळण येते.
कृष्णा जी राव यांनी आपल्या करिअमध्ये अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. मात्र, केजीएफ चित्रपटाने त्यांना यशाचे शिखर गाठूण दिले होते. त्यांना एका सीनमुळे अमाप पसिद्धी मिळाली. यांनंतर त्यांनी लागोपाठ 30 चित्रपटामध्ये काम केले होते. कुमार यांनी दिग्दर्शित केलेला तेलुगू कॉमेडी चित्रपट ‘नैनो नारायणपुर’ यामध्ये अभिनेत्यानी मुख्य भूमिकेतही काम केले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
हेमा मालिनीसोबतच्या लग्नासाठी धर्मेंद्रने दिली ‘इतकी’ रक्कम? जाणून व्हाल चकित
मुलीचं चित्रपटात काम करणं सुपरस्टार धर्मेंद्रला खटकलं, 6 महिने बोलणंच केलं होतं बंद