Thursday, February 22, 2024

‘पूर्वी साउथ चित्रपटांची खिल्ली उडवायचे…’, म्हणत केजीएफ स्टाररने साउथ इंडस्ट्रीवर केले मोठे वक्तव्य

सध्या  साऊथ सर्वत्र चित्रपटांचा जास्त बोलबाला आहे. ‘केजीएफ चॅप्टर2’, ‘आरआरआर’, ‘कांतारा’ सारख्या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांना अपयशाचा समाना करावा लागत आहे. चाहत्यांना देखिल साऊथ चित्रपटांनी भुरळ घातली आहे त्यामुळे प्रेक्षकही साउथ चित्रपट आवडीने पाहात असतात. नुकतंच केजीएफ स्टारर यश याने इंडस्ट्रीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

सद्याच्या काळात प्रेक्षकांना कोणते चित्रपट आवडतील  हे सांगने खूप कठीण असते. आता कोणताही चित्रपट एकूण पाच भाषेत आल्यामुळे प्रेक्षक त्यांना आवडणाऱ्या चित्रपटांकडे जास्त भर देतात. सध्या तर जास्त साउथ चित्रपटांनी चाहत्यांवर भुरळ घातली आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे मात्र, असे पूर्वी न्हवते.

केजीएफ स्टारर यश (Yash) याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये साऊथ इंडस्ट्री बद्दल सागितले होते की, “एक काळ असा होता, जेव्हा साऊथ चित्रपटांना चुकीच्या पद्धतीने घेतले जायचे आणि चित्रपटांचा मजाक उडवला जायचा. मात्र, ‘बाहुबली’ चित्रपटानंतर काही गोष्टी बदलल्या.” यशने पुढे सांगितले की, “10 वर्षापासून आमचे चित्रपट नॉर्थमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. पण सुरुवातीला त्यांना वेगळ्या रुपाने पाहिले जायचे, लोक साउथ चित्रपटांचा मजाक उडवायेच. लोक म्हणायचे हे कसलं अ‍ॅक्शन आहे, सगळ्यांना उडवत आहे. इथून हे सगळं सुरु झालं आणि शेवटी प्रेक्षक या चित्रपटांना जोडले गेले आणि कालाकृतीला समजू लागले. मात्र, त्यासोबतच एक समस्या होती की, आमच्या चित्रपटांना कमी किंमतीत  विकले जायचे आणि खराब डबिंग करुन लोकांना कॉमेडीच्या नावाने दाखवले जायचे.”

 

View this post on Instagram

 

यश पुढे बालतच होता,”आता लोक साउथ चित्रपटांना समजू लागले आहेत आणि याचे पूर्ण श्रेय जाते एसएस राजामौली (SS Rajamauli) यांना. त्यांच्यामुळे लोकांमध्ये हा बदलाव आला आहे. प्रेक्षकांना आमच्या डबिंग केलेल्या चित्रपटाची ओळख होत आहे. ‘जर तुम्हाला हा डोंगर पाजडायचा असेल, तर तुम्हाला सतत प्रयत्न करण्यची गरज असते.’ ‘बाहुबली’ चित्रपटाने ते काम केले. केजीएफला एका वेगळ्या विचाराने बनवले होते. केजीएफला घाबरवण्यासाठी आणि धमकवण्यासाठी न्हवता तर प्रेक्षकांना प्रेरना देण्यासाठी बनवला होता. प्रेक्षकांनी आता साउथ चित्रपटांवर ध्यान द्यायला सुरुवात केली आहे.”

 

View this post on Instagram

 

सांगायचे झाले तर ‘केजीएफ चॅप्टर 2‘ चित्रपटाने 2022 चा सगळ्यात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात 1207 कोटीची गल्ला जमवला आहे. या नंतर दसऱ्या स्थानावर एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर‘ चित्रपट येतो. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला असून कोट्यावदीचा गल्ला मजवला होता. आणि रिषभ शेट्टी (Rishabh Shetty) याचा नुकंत प्रदर्शित झालेला ‘कांतारा‘ चित्रपटाने देखिल या यादीमध्ये जागा मिळवली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अण्णाची ओटीटीवर दमदार एन्ट्री! ‘धारावी बॅंक’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित
‘बेबी कपूर’चे आगमन! गिरगावच्या रिलायन्स रुग्णालयात आलिया भट्ट दाखल

हे देखील वाचा