Tuesday, January 21, 2025
Home बॉलीवूड शबाना आझमी पडल्या हाेत्या विवाहित जावेद अख्तरच्या प्रेमात, वडिलांच्या नाराजीनंतरही केले लग्न

शबाना आझमी पडल्या हाेत्या विवाहित जावेद अख्तरच्या प्रेमात, वडिलांच्या नाराजीनंतरही केले लग्न

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रेमकथा पाहायला मिळतात, काही पूर्ण होतात, तर काही अर्धवट राहून जातात. त्याच वेळी, अशी काही जोडपी आहेत जी इतर लोकांसाठी एक उदाहरण आहेत. असेच एक यशस्वी बॉलिवूड जोडपे म्हणजे जावेद अख्तर आणि शबाना आझमी, जे 1984 पासून एकत्र आहेत. एकीकडे, शबाना आझमी या लाेकप्रिय कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली, तर दुसरीकडे जावेद अख्तर ज्यांनी आपल्या कलामांच्या लेखनातुन चाहत्यांच्या मनावर राज्य केले. चला तर मग आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेऊया, जी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.

जावेद अख्तर (javed akhtar) आणि शबाना आझमी (shabana azmi) यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात 1970 मध्ये अभिनेत्रीच्या घरी झाली. शबाना ही प्रसिद्ध कवी कैफी आझमी यांची मुलगी असून जावेद त्यांच्या घरी लेखन कला शिकत होते. या अनुषंगाने जावेद अनेकदा कैफी आझमी यांच्या घरी त्यांच्या कविता ऐकण्यासाठी येत असे. त्यात शबानाही आईसोबत सहभागी व्हायची.

अशा परिस्थितीत दोघांची मैत्री झाली, ज्याचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. अभिनेत्री जावेद अख्तरच्या काव्यात्मक शैलीच्या प्रेमात पडल्या होत्या, परंतु त्यांची प्रेम कहानी इतकी साेप्पी नव्हती. जावेदचे आधीच लग्न झाले होते, त्यामुळे त्यांच्या प्रेमकथेत अनेक चढ-उतार आले. जेव्हा कैफी आझमीला दोघांच्या प्रेमाची माहिती मिळाली तेव्हा ते खूप संतापले होते. जावेदचे केवळ लग्नच झाले नव्हते, तर त्यांना दोन मुलेही होती.

जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हनी इराणी होते. हा प्रकार हनी इराणीला समजल्यानंतर घरात रोज भांडणे होत होती. जावेद आणि हनी यांना फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही दोन मुलेही होती. पण जेव्हा हनीला वाटले की, या नात्यात काहीच उरले नाही आणि भांडणे दिवसेंदिवस वाढत आहेत, तेव्हा तिने जावेद अख्तरला लग्न करण्याची परवानगी दिली. तसेच हनीने लग्नाच्या सात वर्षानंतर जावेद अख्तरला घटस्फोट दिला.

जावेद अख्तरचे त्यांच्या पहिल्या पत्नीसोबतचे नाते संपुष्टात आले होते, पण कैफी आझमी अजूनही त्यांच्या नात्याच्या विरोधात होते. आपली मुलगी कोणाचे घर तोडण्याचे कारण बनू नये असे त्यांना वाटत होते. शबानाने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला की जावेद आणि हनीचे नाते तिच्यामुळे तुटत नाहीये, तर मुळात दोघांनाच एकत्र राहायचे नाही. यानंतर शबाना आझमी यांनी 1984 मध्ये स्वतःहून 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या जावेद अख्तरसोबत लग्न केले आणि आज 38 वर्षांनंतरही दोघे एकत्र आहेत. (wedding anniversary javed akhtar shabana azmi love story actress shabana parents were against of their marriage)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
चार दिन की चांदनी! गौतमी पाटीलवर मेघा घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सगळ्या मर्यादा…’

पहिल्या नजरेत कधीच विवेक दिव्यांका पडले नाही प्रेमात, मग काय आहे त्यांची प्रेमकहाणी? वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा