Wednesday, December 6, 2023

जेव्हा शबाना आझमींना रडताना पाहून अभिनेत्रीवर खेकसले होते शशी कपूर; म्हणाले, ‘ज्या दिवशी हिरोईन…’

बॉलिवूडला मोठं करण्यात ज्या खानदानाचं नाव येतं त्यात कपूर हे नाव आघाडीवर आहे. कपूरांच्या प्रत्येक पिढीतून एकतरी अभिनेत्री किंवा अभिनेता हिंदी सिनेमात अभिनयाचा डंका वाजवतोय. त्यापैकीच एक होते, शशी कपूर. शशी कपूर यांना त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात हँडसम मानले जायचे. मुली आणि महिला त्यांच्या अभिनय आणि रूपावर अक्षरश: जीव ओवाळून टाकायच्या. यामध्ये अभिनेत्रींचाही समावेश होता. कारकीर्द शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या शशी कपूर यांची शनिवारी (दि. 18 मार्च) रोजी जयंती आहे. या निमित्त जाणून घेऊया एका अभिनेत्रीसोबतचा त्यांचा तो किस्सा ज्याने सर्वांचे लक्ष वेधले होते.

बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) नेहमीच त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जातात. 80च्या दशकात त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. शबानाने निर्माता सीपी दीक्षित यांचा ‘फकिरा’ चित्रपट साईन केलेला. नंतर त्यांना कळले की, या चित्रपटात त्यांच्यासोबत शशी कपूर (Shashi Kapoor) हिरो असणार आहे. हे जाणून शबाना यांना खूप आनंद झाला. कारण त्या शशी कपूर यांच्या खूप मोठ्या फॅन होत्या. यापूर्वी शबानाने आर्ट फिल्ममध्ये काम केले होते.

‘फकिरा’ चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले, तेव्हा त्यांना एक गाणे शूट करायचे होते. त्यांनी याआधी कधीही डान्स केला नव्हता. त्यामुळे त्यांना नीट डान्स करता येत नव्हता. वारंवार रिटेक केल्यामुळे डान्स कोरिओग्राफरही अस्वस्थ होऊ लागला. जसजसा वेळ निघून गेला तसतसा शबाना यांचा आत्मविश्वास कमी झाला. व्यावसायिक चित्रपटात काम करणं माझ्यासाठी नाही, असं त्यांना वाटू लागलं. बऱ्याच दिवसांनी शबाना इतक्या तुटल्या की, त्या सेटवरच रडायला लागल्या आणि रडत आपल्या मेकअप रूममध्ये गेल्या.

शशी कपूर यांना जेव्हा शबाना अशाप्रकारे सेटवरून जाताना दिसल्या, तेव्हा ते देखील त्यांच्या पाठोपाठ मेकअप रूममध्ये गेले आणि शबाना यांना रडण्याचे कारण विचारू लागले. तेव्हा शबाना यांनी जोरजोरात रडायला सुरुवात केली आणि म्हणाल्या की, “मी नाचत नाही, मला नियंत्रित करता येत नाही आणि रडले.” शबाना यांना वाटले की, शशी त्यांना शांत करतील, सांत्वन करतील, पण घडले उलटेच.

शशी कपूर रागाने म्हणाले की, “ज्या दिवशी तुम्ही हिरोईन बनायचे ठरवले त्या दिवशी या सगळ्याचा विचार का केला नाही? तेव्हा वाटलं नव्हतं की अभिनेत्रीलाही नाचावं लागेल. आता गप्प बसा आणि सेटवर चालत जा आणि तुमच्या डान्सचा सराव करा.” शशी पुढे म्हणाले की, “माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही देखील स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. मेहनत केली तर हे सर्व शिकायला मिळेल, पण आजच्या नंतर कधीही घाबरून सेटवरून पळून जाऊ नका.”

असं म्हणत शशी कपूर मेकअप रूममधून बाहेर आले. नंतर शबाना आझमी यांनी स्वतःची काळजी घेतली आणि शशी कपूर यांचे म्हणणे त्यांच्या लक्षात आले. सेटवर परत आल्यावर शबाना यांनी काही काळ डान्सचा सराव केला आणि शॉट ओके केला.(when shashi kapoor scolds shabana azmi on the sets of the film after seeing seen her crying the reason will surprise you too)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
लावणी कलाकार मेघा घाडगे हिला नेमकं का केल जातंय ट्रोल? काय आहे प्रकरण, एकदा जाणून घ्याच
आॅनस्क्रिन मायलेकीच्या जाेडीनं ‘नाचू किती गाण्यावर’ लावले ठुमके, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा