Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

ओंकार भोजने प्रथमच मुख्य भूमिकेत! ‘सरला एक कोटी’मध्ये साकारणार हटके रोल

आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर ओंकार भोजने याचा एक नवीन ‘रोल’ आपल्याला बघायला मिळणार आहे. हो, तुम्ही वाचताय ते अगदी खरंय. ओंकार भोजने आता मोठं स्क्रिन गाजविण्यासाठी सज्ज आहे. ओंकारची मुख्य भूमिका असलेला ‘सरला एक कोटी’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ओंकार एका अनाेख्या लूकमध्ये दिसत आहे. कायम विनोदी भूमिकेत ओंकार बघितल्यामुळे, आता या नवीन लूकची चर्चा होत आहे. हा चित्रपट नक्की काय आहे आणि ओंकारची त्यात काय भूमिका असेल याची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

‘सरला एक कोटी’ या नावातच या चित्रपटाचं वेगळेपण आहे. ओंकारच्या या पोस्टरमध्ये तो पैसे लाऊन पत्ते खेळताना दिसत आहे. त्यासाेबतच त्याच्यासमाेर सिगरेटची थोटकं आणी दारूची बाटली आहे. पत्ते खेळण्यात तरबेज असलेला ओंकार एक बिधनास्त लूक देताना दिसतोय. याशिवाय पोस्टरवर ‘जो नशिबालाही डावाववर लावतो तोच खरा गॅम्बलर’ असं लिहिलेलं आहे. त्यामुळे पत्ते, दारूचा गुत्ता, सिगरेट, बिनधास्त हावभाव अशा सगळ्या गोष्टी आणि चित्रपटाचं नाव ‘सरला एक कोटी’ असल्याने चित्रपटाचा नक्की विषय काय, त्याची स्टाेरी काय आणि हे सगळं कधी उलगडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. त्यातही ओंकारचं हे पोस्टर बघून अनेकांच्या मनात प्रश्न पडला आहे की, चित्रपटाच्या नावात असलेली ‘सरला’ कुठंय?

सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांची निर्मित ‘सरला एक कोटी’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांचे असून, कार्यकारी निर्माते विनोद नाईक हे आहेत. हा चित्रपट नवीन वर्षात 20 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित हाेत आहे. (Marathi actor Omkar Bhojane lead role for the first time in ‘sarla ek koti’)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
टायगर नव्हे तर ‘या’ व्यक्तिच्या प्रेमात पडली दिशा? खुद्द केला खुलासा

कहरच! उर्फिने शेअर केला लेटेस्ट व्हिडिओ; स्वतःलाच म्हणाली, ‘बेशरम, हास्यास्पद, अश्लील…’

हे देखील वाचा