Saturday, April 20, 2024

टायगर नव्हे तर ‘या’ व्यक्तिच्या प्रेमात पडली दिशा? खुद्द केला खुलासा

बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पटानी चित्रपटासाेबतच तिच्या नात्यामुळे चर्चेत असते. ती सध्या सर्बियन मॉडेल अलेक्संदर ऍलेक्स इलीला डेट करत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या नात्याच्या बातम्या समोर येत आहेत. तरीदेखील दोघांनी अद्याप त्यांचे नाते स्वीकारले नाही आणि दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगतात. अशातच अलेक्झांडरने त्यांच्या नात्याबद्दल माेठा खुलासा केला आहे. 

अलेक्झांडर (aleksandar alex ili ) हॉलिवूड हिरोपेक्षा कमी नाही. 6 फूट उंची आणि इंप्रेसिव पर्सनालिटी असलेला अलेक्झांडर 2015 मध्ये दिशाचा फ्लॅटमेटही होता. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अलेक्झांडरने दिशा पटनीसोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. अलेक्झांडरने सांगितले की, “दिशा पटनी माझ्या कुटुंबासारखी आहे. या स्पर्धात्मक युगात, जेव्हा जेव्हा आपण निराश होतो तेव्हा आपण एकमेकांना आधार देतो आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. मी पाहतो की, काही आठवड्यांपासून आम्ही डेटिंग करत असल्याच्या अफवा आहेत. मात्र, आम्हाला सत्य माहीत आहे. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता का असते हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे. लोक इतर लोकांना त्यांचे जीवन शांततेत का जगू देत नाहीत.” असा प्रश्न अलेक्झांडरने केला आहेय.

अलेक्झांडरने दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ यांच्या नात्याबद्दलही सांगितले आहे. अलेक्झांडरने मुलाखतीदरम्यान सांगितले की, “मी देखील टायगर श्रॉफचा चांगला मित्र आहे. दिशा, टायगर आणि मी कधी कधी एकत्र वेळ घालवतो, पण त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे त्यांना काही फरक पडत नाही.” यापूर्वी टायगरनेही आपल्या नात्याबद्दल दुजोरा दिला हाेता. टायगर श्रॉफने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सांगितले होते की, “तो सध्या सिंगल आहे.”

अलेक्झांडर हा सर्बियाचा असून मॉडेलिंग करतो. अलेक्झांडर गेल्या 7 वर्षांपासून भारतात राहत आहे. मॉडेलिंगसोबतच अलेक्झांडर अभिनय विश्वातही पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सिकंदर आणि दिशा पटनी 2015 मध्ये फ्लॅटमेट होते. तेव्हापासून दोघांची मैत्री झाली. अशातच दिशा आणि सिकंदर अनेकदा एकत्र दिसतात. सिकंदर सध्या दिशा पटनीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. मात्र, अलेक्झांडर दिशाला फक्त आपली मैत्री माणताे. (bollywood actre`s`s disha patanis rumored bf aleksandar alex ili breaks silence over her relationship shared flat in 2015 tiger shroff)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
विवाहित असूनही राज बब्बर पडले होते ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात; पुढे अशाप्रकारे थाटला होता संसार

उत्कृष्ट अभिनयाने दशक गाजवणाऱ्या, प्रतिभावान स्मिता पाटील यांच्या 5 अविस्मरणीय भूमिकांना आज देऊयात उजाळा

हे देखील वाचा