उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे टीकेची शिकार होत आहे. अशातच ट्रोल्सची पर्वा न करता उर्फी प्रत्येक वेळी तिच्या नवीन शैलीने लोकांना आश्चर्यचकित करते. अलीकडेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या पाेशाखाबद्दल पोलिसांत तक्रार नोंदवून कारवाईची मागणी केली. यावेळी कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राजकारण्यांवर निशाणा साधत, राजकारण्यांना काही काम नाही का, असा प्रश्न उर्फी हिने केला. यानंतर पुन्हा एकदा उर्फीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
उर्फी जावेद (urfi javed) हिने तिचा लेटेस्ट व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तीने हातात बेड्या घालून काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तिचा हा व्हिडिओ शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्हा सर्वांना मला हँडकफमध्ये पाहायचे होते, बरोबर? तुमची इच्छा पूर्ण केली.” उर्फीचे काही चाहते तिच्या स्टाइलचे कौतुक करत आहेत तर काही लोक तिला ट्रोलही करत आहेत.
View this post on Instagram
उर्फी जावेदच्या या व्हिडिओला ट्राेल करत एका युजरने लिहिले की, “या थंडीत तू मरशील”, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “ही मुलगी कशी कपडे घालते.” जिथे लाेक उर्फीला ट्राेल करत आहे तिथेच एकाने लिहिले की, “उर्फ तु जशी आहे तशीच रहा.. जगासाठी बदलू नकाे, स्वतःसाठी जग बदला, मी तुझ्यासोबत आहे.”

उर्फी जावेदच्या कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राजकारण्यांची खिल्ली उडवत एका चाहत्याने लिहिले की, “उर्फीच्या कपड्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बला’त्कार पीडितेची, जिला कारमध्ये 5 जणांनी ओढून नेले.” उर्फीने इन्स्टा स्टोरीवर ही कमेंट शेअर केली आणि लिहिले की, ‘माझा मुद्दा हाच आहे’.
सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या उर्फी जावेदने 2016 मध्ये ‘बडे भैया की दुल्हनिया’ या टीव्ही मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अनेक टीव्ही शोचा भाग असलेल्या उर्फीला ‘बिग बॉस ओटीटी’ मधून ओळख मिळाली.(tv actress urfi javed says all really wanted to see me in handcuffs new outfit will shock you )
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तू तेव्हा तशी’ फेम स्वानंद केतकरचा साखरपुडा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
मनोज वाजपेयी यांचे ट्विटर अकाउंट हॅक, इंस्टाग्रामवर नोट शेअर करून चाहत्यांना केले सावध