असे म्हणतात की, एखाद्या गोष्टीचे व्यसन लागले की, ते सहजासहजी जात नसते. मात्र, जेव्हा आपण मनाशी निर्धार करतो किंवा कुटुंबातील व्यक्तींकडे पाहून मनाशी पक्के करतो, तेव्हा कोणत्याही वाईट सवयीवर मात करण्यात यश मिळत जाते. असेच काहीसे आता टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी याच्याबाबतही आहे. अर्जुन त्याच्या कामाशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. तो अभिनेत्यासोबतच एक पती आणि वडीलही आहे. त्याचे कुटुंबासाठीचे प्रेम जगजाहीर आहे. अशात त्याने नुकतेच मुलासाठी वाईट सवय सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्जुन बिजलानीने सोडली ‘ही’ सवय
अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) याने नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून धुम्रपान करणे सोडले आहे. त्याने म्हटले आहे की, त्याने हे सर्व त्याच्या मुलासाठी केले आहे. माध्यमांशी बोलताना अर्जुन म्हणाला की, “यावर्षी मी विचार केला आहे की, मी धुम्रपान सोडले पाहिजे. हे सोपे नाहीये. मात्र, मी प्रयत्न करत आहे. एका आठवड्यापासून मी धुम्रपान केले नाहीये. ही एक चांगली सुरुवात आहे. मला बऱ्याच काळापासून ही सवय सोडायची होती. मात्र, हे सोपे नाहीये. मी माझ्या मुलासाठी हा निर्णय घेतला. कारण, मला त्याच्यासमोर एक चांगले उदाहरण तयार करायचे होते. मी सकारात्मकरीत्या याची सुरुवात केली. असे करून मला ताजेतवाणे आणि चांगले वाटत आहे.”
View this post on Instagram
अर्जुन हा मागील 15 वर्षांपासून धुम्रपान करत होता. आता त्याने एकदाची ही सवय सोडण्याचा निर्णय केला. फक्त धुम्रपानच नाही, तर अर्जुनने मद्यपानही सोडले आहे. मात्र, काही वेळा तो याचे थोड्या प्रमाणात सेवनही करतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 2013मध्ये नेहा स्वामी हिच्यासोबत संसार थाटला होता. तो 2015मध्ये बापमाणूस बनला. त्याच्या मुलाचे नाव अयान आहे.
View this post on Instagram
अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे. त्यात ‘नागिन’, ‘परदेस में हैं मेरा दिल’, ‘इश्क में मरजावां’ या मालिकांचा समावेश आहे. आता तो लवकरच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्यासोबत एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसू शकतो. (Actor arjun bijlani quits smoking for his son ayaan bijlani from new year)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हीच ती नैसर्गिक सुंदरता! रश्मिकाने विमानतळावर बिनधास्तपणे काढला मास्क; पाहायला मिळाला नो मेकअप लूक
अखेर का दिली आईने फरहान अख्तरला घराबाहेर काढण्याची धमकी? वाचा मनोरंजक किस्सा