Monday, April 15, 2024

अखेर का दिली आईने फरहान अख्तरला घराबाहेर काढण्याची धमकी? वाचा मनोरंजक किस्सा

फरहान हा एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनता, दिग्दर्शक आणि गायकही आहे. फरहान अख्तरने ‘रॉक ऑन’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तो अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये दिसला. नुकतचं त्याने त्याची प्रेयसी शिबानी दांडेकरसोबत कुटुंबिय आणि नातेवाईकांसोबत खंडाळ्यातील एका फार्महाऊसवरती लग्न केलं

फरहान अख्तर लाइफ फॅक्ट्स:
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा एक प्रसिद्ध गायक आणि दिग्दर्शक आहे. फरहान 9 जानेवारीला त्याचा 50वा वाढदिवस साजरा करत आहे. फरहान अख्तर हा चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचा मुलगा आहे. जावेद अख्तरने दोन विवाह केले होते. जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हनी इराणी असून फरहान हा तिचा मुलगा आहे. तो त्याची दुसरी आई शबाना आझमी यांच्याही खूप जवळ आहे. फरहान अख्तरने 1991 मध्ये आलेल्या ‘लम्हे’ चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. मात्र, त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती 2001मध्ये आलेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटातून.

फरहान 2 वर्ष घरी बसला फरहान:
2001 मध्ये आलेला ‘दिल चाहता है’ हा चित्रपट कल्ट क्लासिक मानला जातो. अजूनही लोकांना हा चित्रपट पाहायला आवडतो. कॉलेज संपल्यानंतर फरहान अख्तर 2 वर्षे घरी बसला होता. तो फक्त घरी बसून सिनेमा बघून टाईमपास करायचा. त्याची ही रोजची सवय पाहून त्याची आई अस्वस्थ झाली आणि शेवटी तिने त्याला घराबाहेर काढण्याची धमकी दिलेली. आईची धमकी ऐकून फरहान थोडा गंभीर झाला आणि ‘दिल चाहता है’ सारखा क्लासिक चित्रपट तयार केला. फरहान अख्तरने 2008 मध्ये आलेल्या ‘रॉक ऑन’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर फरहान भाग मिल्खा भाग, कार्तिक कॉलिंग कॉलिंग, लक बाय चान्स आणि द स्काय इज पिंक यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला.

शिबानी दांडेकरसोबत केले दुसरे लग्न:
फरहानच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर फरहान अख्तरने दोन लग्न केली आहेत. फरहानचे पहिले लग्न अधुना भबानीशी झाले होते, ज्यांना शाक्य आणि अकिरा नावाची दोन मुले आहेत. फरहान आणि अधुनाची भेट ‘दिल चाहता है’च्या सेटवर झाली होती. मात्र, 2017 मध्ये फरहान आणि अधुना यांचा घटस्फोट झाला. अधुनाशी घटस्फोट घेतल्यानंतर फरहान अख्तरने शिवानी दांडेकरसोबत लग्न केले.(mother wanted to throw farhan akhtar out of the house why read here)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिनेमाचं ए़़डिटींग भावासाठी होतं फक्त एक निमीत्त, थेट दिग्दर्शक फराह खानलाच पटवून केलं लग्न
काय सांगता राव ! फराह खान आणि तिच्या नवऱ्यात आहे 8 वर्षांचं अंतर, 16 वर्षापूर्वी शाहरूखने केलंय कन्यादान

हे देखील वाचा